ब्रेकिंग - गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांकडून कारवाईचा बडगा; ३० जण ३ दिवसांकरीता तडीपार; दोन महिलांचाही यात समावेश
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२७ सप्टेंबर) :- उद्या होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांकडून रेकॉर्डवरील अनेक आरोपींवर कलम १४४ (२) अन्वये कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामध्ये इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ३० जणांना इंदापूर तालुक्याच्या हद्दीतून पुढील ३ दिवसांकरीता हद्दपार करण्यात आले आहे. गणपती विसर्जन कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे, तथा तसे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिल्याचे इंदापूर पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांकडून संबंधित आरोपींची नावे असलेले पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये, राजेन्द्र उर्फ राजु महादेव भाळे (रा. खोरोची, ता. इंदापूर), बंटी उर्फ सुमित सुधीर सोनवणे (रा. आंबेडकरनगर, इंदापूर), राहुल बाळासाहेब पवार (रा. वडारगल्ली, इंदापूर ) माऊली उर्फ ज्ञानेश्वर बाळासाहेब तोंडे (रा. लोणीदेवकर ता. इंदापूर ), विवेक रामदास चौगुले (रा. वडारगल्ली, इंदापूर ), नितीन महादेव घनवट (रा. आठभाईमळा, इंदापूर ) संजय उमाजी चव्हाण (रा. ...