बिग ब्रेकिंग - १ कप चहा शेतकऱ्याला पडला १ लाख रुपयांना; इंदापूर तहसीलजवळ झालेल्या चोरीच्या प्रकाराने शहरात खळबळ

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (६ सप्टेंबर) :- एका व्यक्तीला एक चहा चक्क १ लाख रुपयांना पडला. होय ! १ लाख रुपयांना. हे घडलंय ते इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारतीनजीक. नगरपरिषदेच्या गाळ्यांमध्ये भोईटे अमृततुल्य चहाच्या सेंटरवर चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका व्यक्तीच्या गाडीची काच फोडून चोरट्याने तब्बल १ लाख रु. चोरून नेहले. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. या संदर्भात दिलीप नारायण सावंत (रा. खोराची, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी इंदापूर अर्बन बँकेतून पैसे काढून भोईटे यांच्या चहाच्या सेंटरवर चहा पिण्यासाठी अवघे १० मिनिटे थांबले होते. फिर्यादी यांनी बँकेतून काढलेली रक्कम आपल्या स्विफ्ट (MH 45 AL 9053) गाडीच्या ड्रॉवरमध्ये ठेऊन, गाडी लॉक करून चहा पिण्यासाठी गेले होते. दरम्यान चहा पिऊन परत आल्यानंतर त्यांना आपल्या गाडीची पुढील डाव्या बाजूची काच फुटलेली दिसली. यावेळी गाडीतील ड्रॉवर उघडे आणि त्यातील रक्कम गायब असल्याचे त्यांना दिसले.

दिवसाढवळ्या, भर दुपारी आणि वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. किंबहुना इंदापूर शहरात दिवसाढवळ्या चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून, चोरटे किती निडर झाल्याचे, तथा चोरट्यांना पोलीस प्रशासनाचा, कायद्याचा धाक उरला नसल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. दरम्यान, शहरात वाढत्या चोऱ्या पाहता संपूर्ण शहर अंडर सीसीटिव्ही आणण्याची गरज भासू लागली आहे. प्रशासकीय इमारतीच्या गेटवर रस्त्याच्या उत्तर व दक्षिण बाजूस कव्हर करेल असे उत्तम दर्जाचे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासह शहरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही बसवणे आता गरजेचे झाले आहे. उम्मीद करते है या घटनेनंतर संबंधित प्रशासन याला थोडं सिरीयसली घेईल...!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट