सोनाई जवळ डिव्हायडरला गाडी धडकल्याने आरोपी पकडला गेला; आता याला त्याचं बॅड लक म्हणायचं? का पाठलाग करणाऱ्यांचं धाडस?...!!!


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (९ सप्टेंबर) :- बऱ्याच वेळा आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना कसब पणाला लावावे लागतात. मात्र कधी कधी आरोपी आपल्याच चुकांमुळे, तर कधी नागरिकांच्या धाडसामुळे पकडलेही जातात. गुरुवारी (७ सप्टेंबर) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गलांडवाडी नं. २ आणि गोखळी हद्दीदरम्यान असाच एक किस्सा घडला. या घटनेत गलांडवाडी नं. २ (ता. इंदापूर) हद्दीतील एका शेतीच्या कंपाऊंडचे लोखंडी खांब आणि जाळी चोरणाऱ्या तिघा आरोपींपैकी एका आरोपीला पाठलाग करून शेतमालकाने पकडले. मात्र हे शक्य झाले ते आरोपीची दुचाकी (एमएच १३ सीजी ७७८२) गोखळी हद्दीतील सोनाई पेट्रोल पंपाजवळ पालखी मार्गावरील डिव्हायडरला धडकून अपघात झाल्याने. या घटनेत किरण शशिकांत काळे (रा. इंदिरा घरकुल, अकलूज, ता. माळशिरस) हा आरोपी जखमी अवस्थेत पकडला गेला.

या घटनेत आरोपीच्या दुचाकीवर बसलेला एक आणि दुसऱ्या दुचाकीवरील एक असे त्याचे दोघे साथीदार मात्र फरार होने मे कामयाब हूए. सूरज कैलास चोरमले (रा. इंदिरा घरकुल, अकलूज, ता. माळशिरस) आणि गणेश चंद्रकांत काळे (रा. नवीन बाजारतळ, मार्केट कमिटीजवळ, इंदापूर) अशी त्याच्या दोघा साथीदारांची नावे आहेत. या तिघांविरोधात शेतमालक संजय चंद्रकांत दोशी (रा. व्यंकटेशनगर, इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या तिघा आरोपींनी फिर्यादी यांच्या शेतीच्या कंपाऊंडचे ३८ लोखंडी खांब आणि ३०० किलो जाळी असा एकूण ५० हजारांच्या आसपास मुद्देमाल चोरून नेहला होता. दुसऱ्यांदा चोरीचा असाच प्रयत्न शेतातील लकटे नामी मजुराच्या हुशारीमुळे फसला. दरम्यान, दुचाकीवरून निमगावच्या दिशेने धूम ठोकणाऱ्या किरण शशिकांत काळे आणि त्याच्या साथीदाराचा फिर्यादी, त्यांचा मुलगा ईशान आणि त्यांच्या खताच्या दुकानातील कामगार बडेसाब यांनी धाडसाने पाठलाग केला. यावेळी वर नमूद वेळ आणि ठिकाणी अपघात झाल्याने दोघे आरोपी खाली पडले. पैकी एक जण जवळच्या डाळिंबाच्या बागेत पळून गेला. मात्र गाडी चालवत असलेला किरण काळे हा आरोपी जखमी झाल्याने जाग्यावरच पकडला गेला. आता याला आरोपीचं बॅड लक म्हणायचं? का दिवसाढवळ्या चोरी आणि गाडी नीट न चालवण्याचा मूर्खपणा म्हणायचं? काहीही असो ! फिर्यादी आणि इतरांच्या धाडसामुळे हे घडलं हे मात्र खरं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट