ब्रेकिंग - गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांकडून कारवाईचा बडगा; ३० जण ३ दिवसांकरीता तडीपार; दोन महिलांचाही यात समावेश
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२७ सप्टेंबर) :- उद्या होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांकडून रेकॉर्डवरील अनेक आरोपींवर कलम १४४ (२) अन्वये कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यामध्ये इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ३० जणांना इंदापूर तालुक्याच्या हद्दीतून पुढील ३ दिवसांकरीता हद्दपार करण्यात आले आहे. गणपती विसर्जन कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे, तथा तसे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिल्याचे इंदापूर पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांकडून संबंधित आरोपींची नावे असलेले पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यामध्ये, राजेन्द्र उर्फ राजु महादेव भाळे (रा. खोरोची, ता. इंदापूर), बंटी उर्फ सुमित सुधीर सोनवणे (रा. आंबेडकरनगर, इंदापूर), राहुल बाळासाहेब पवार (रा. वडारगल्ली, इंदापूर) माऊली उर्फ ज्ञानेश्वर बाळासाहेब तोंडे (रा. लोणीदेवकर ता. इंदापूर), विवेक रामदास चौगुले (रा. वडारगल्ली, इंदापूर), नितीन महादेव घनवट (रा. आठभाईमळा, इंदापूर) संजय उमाजी चव्हाण (रा. रामोशीगल्ली, इंदापूर), अंबादास धनाजी ढावरे (रा. साठेनगर, इंदापूर), अमजद दस्तगीर शेख (रा. व्यंकटेशनगर, इंदापूर), रमेश विठ्ठल झरेकर (रा. बिजवडी ता. इंदापूर), सुनिल प्रेमचंद बनसोडे (रा. सरस्वतीनगर, इंदापूर), संतोष अमृत काळे (रा. बावडा, ता. इंदापूर), आनंद विजय जाधव (रा. भांडगाव, ता. इंदापूर), महेश धुळा भोसले (रा. लाखेवाडी, ता. इंदापूर), अमीर नुरखान देशमुख (रा. वडापुरी, ता. इंदापूर), सय्यद हीरालाल शेख (रा. काटी, ता. इंदापूर) सतिष भानुदास चव्हाण (रा. रेडणी, ता. इंदापूर), बाळु विठ्ठल मिसाळ (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर), अमोल बाबु काळे (रा. निरानृसिंहपूर, ता. इंदापूर), रामदास रघुनाथ गायकवाड (रा. भांडगाव, ता. इंदापूर), मधुकर बापु मिसाळ (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर), भगवान नामदेव कांबळे (रा. भांडगाव ता. इंदापूर), शाहनवाज रेहमान मुलाणी (रा. काटी, ता. इंदापूर), शामराव प्रताप सरतापे (रा. निरनिमगाव ता. इंदापूर), दादा शिवाजी मदने (रा. भांडगाव ता. इंदापूर), राजेंन्द्र नारायण रेडेकर (रा. वडापुरी, ता. इंदापूर), सुनिल दादा कुंभार (रा. वरकुटे बु." ता. इंदापूर) संगीता दत्तु भोंग (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर), जोत्सना बाबासाहेब कांबळे (रा. बावडा ता. इंदापूर), बुबी उर्फ हनिफ शफीक शेख (रा. काटी ता. इंदापूर)
या सर्व आरोपींना पुढील ३ दिवस इंदापूर तालुक्यातील कोणत्याही गावात वास्तव्यास न राहण्याचे, तसेच सदर प्रतिबंधित क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. सदरची कारवाई अंमलबजावणी करीता पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. लंगुटे, सहा.फौज प्रकाश माने, पो.हवा. ज्ञानेश्वर जाधव, पो.ना. सलमान खान, पो.ना. मल्हारे, पो.कॉ. नंदु जाधव, पो.कॉ. विशाल चौधर, पो.कॉ. गणेश डेरे, पो.कॉ. सागर चौधर यांनी सहभाग घेतला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा