निवड सदाचार आणि भ्रष्टाचारातील; लोकांचा कल कोणाच्या बाजूने?
संपादकीय ... ए फॉर अमेठीनंतर बी फॉर बारामतीवर कब्जा करण्यासाठी भाजपने सर्वकाही पणाला लावले आहे. अजित पवारांच्या रुपात आयतच कोलीत हाती लागल्याने भाजपला हे काम अधिक सोप्प आणि सोईस्कर झाल्याचं म्हटलं जात आहे. बारामतीत पवारांना पवारच हरवू शकतात याचा अंदाजही भाजपला आहे. त्यामुळेच अजित पवारांच्या माध्यमातून पवारांच्या पायात पवारांचाच पाय अडकवण्याचा डाव भाजपने पूर्णत्वास आणला आहे. परिणामी "घरका भेदी लंका ढाये" ही म्हण खरी ठरते, का घर का भेदी कायमचा घराबाहेर फेकला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किंतु परंतु "पुढारी एक तरफ आणि जनता एक तरफ" अशी परिस्थिती जमिनीस्तरावर असल्याने ही खेळी भाजप आणि अजित पवार यांच्यावरच उलटणार असंच एकंदरीत चित्र दिसत आहे. कुटुंब, पक्ष, विचारधारा आणि ज्यांनी नेता केलं त्या मतदारांना डावलून भाजपशी मैत्री करण्यामागे अजित पवारांची काय अडचण होती हे न कळण्याइतपत जनता खुळी किंवा भोळी नाही. तदनंतरही मतदारांना भ्रष्टाचार प्रकरणातील क्लीन चीट खरंच क्लीन होती हे पटवून देण्यात अजित पवार यशस्वी होतात, का अद्याप भ्रष्टाचाराचा एकही आरोप न झालेल्या संसदरत्न खास...