पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापूर बंद - तर व्यापाऱ्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचाही बंदला विरोध

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) रविवार (३१ जानेवारी) : कोरोनाच्या प्रदीर्घ बंदमुळे व्यापारी आणि रोजच्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह  करणाऱ्या मजूर वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले असताना वारंवार इंदापूर बंदसारख्या प्रयोगांमुळे इंदापूर शहरातील व्यापारी व मजूर वर्ग त्रस्त झाला असून, बंदचे प्रस्थ थांबले नाही तर व्यापारी व मजूर वर्गाच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी इंदापूर शहर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा पावित्रा शिवसेना शहरप्रमुख महादेव सोमवंशी यांनी घेतला आहे. तर सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत शिताप यांनी देखील व्यापारी व मजुरांसाठी 'दुष्काळात तेरावा महिना' ठरत असणाऱ्या बंदसारख्या भूमिकांना विरोध दर्शविला असून, बंदसाठी आवश्यक कारणे व योग्य नियमावली असावी अशी भूमिका मांडली आहे. तर व्यापाऱ्यांच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल - शिवसेना शहर प्रमुख लॉकडाऊननंतर व्यापाऱ्यांसमोर आजही बऱ्याच समस्या आहेत.  लॉकडाऊनसारख्या प्रदीर्घ बंदनंतरही मागील २ महिन्यात ३ वेळा इंदापूर बंद राहिले आहे.   इंदापूर शहरात छोटे व्य...

बेकायदेशिर पिस्टल विक्री करणारी टोळी गजाआड; १० राऊंडसह ७ पिस्टल हस्तगत

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) बारामती (२८ जानेवारी)  : मध्यप्रदेशहून विक्रीसाठी आणलेल्या बेकायदेशीर ७ गावठी पिस्टल आणि १० राऊंडसह बारामती पोलीसांनी एकूण २ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणी ५ सराईत गुन्हेगारांना काल (२७ जानेवारी) रुई पाटी (ता. बारामती) या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील ही या वर्षातील सर्वात मोठी कार्यवाही मानली जात आहे. वरील गुन्ह्यातील अदिनाथ ईश्वर गिरमे हा आरोपी हॉटेल चालकास मारहाण करून पैसे लुबाडण्याच्या आणखी एका गुन्ह्यामध्ये बारामती तालुका पोलीसांच्या रडारवर होता. सविस्तर वृत्त असे की , हॉटेल चालकास मारहाण व पैसे लुबाडल्यासंबंधी दरोड्याचा प्रकरणात बारामती तालुका पोलीसांच्या रडारवर असलेला अदिनाथ ईश्वर गिरमे (वय २१ वर्षे, रा. पाटस, ता. दौड जि. पुणे) हा आरोपी काल (२७ जानेवारी) आपल्या इतर साथीदारांसह रुई पाटी (ता. बारामती) याठिकाणी बेकायदेशीर गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे आणि विजय वाघमोडे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकान...

Breaking - इंदापूरचे पी.आय. नारायण सारंगकर यांची उचलबांगडी? अतिरिक्त पदभार गोडसे यांच्याकडे

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) इंदापूर (२५ जानेवारी)  : इंदापूर पोलीस ठाण्याच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वात जास्त वादग्रस्त ठरलेले पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हेे १५ दिवस रजेवर गेले आहेत. मात्र इंदापूर पोलीस ठाण्यातून त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याची व बारामती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्याकडे इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सारंगकर यांच्यावर आपल्या अधिकारांचा गैरवापर करून इंदापूर पोलीस ठाण्याला सर्वसामान्यांवर अन्याय करण्याचा अड्डा बनवल्याचे अनेक आरोप झाले आहेत. त्यांच्या वादग्रस्त कारभाराची झळ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कॉलरपर्यंत पोहोचल्याने मागील अनेक दिवसांपासून इंदापूरमध्ये 'सारंगकर' हेच ब्रेकिंग बातमीचा विषय ठरत होते. मार्च २०२० मध्ये इंदापूर पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या नारायण सारंगकर यांच्यावर मागील १० महिन्यात भ्रष्ट कारभाराचे ढीगभर आरोप झाल्याने ते इंदापूर पोलीस ठाण्याचे आतापर्यंतचे सर्वात जास्त वादग्रस्त पोली...

काटी ग्रामपंचायतीच्या इतिहासातील सर्वात तरुण सदस्य

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) शनिवार (२३ जानेवारी)  : १५ जानेवारीला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काटी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काटी ग्रामपंचायतीच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचे (२९ वर्ष) व या निवडणुकीमधील इंदापूर तालुक्यात सर्वात जास्त शिक्षित उमेदवार असणारे विपुल बबन वाघमोडे विजयी झाले आहेत. लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला, आता माझा कुणीही विरोधक नसून, केवळ विकासकामांच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय देत लोकांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. इंदापूर तालुक्यात ५५६ जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १३५२ उमेदवार, तर काटी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये मुख्य आकर्षण ठरलेले विपुल बबन वाघमोडे काटी ग्रामपंचायतीच्या इतिहासात निवडून येणारे सर्वात कमी वयाचे उमेदवार ठरले आहेत. अवघे २९ वर्ष वय असणारे विपुल यांचे आजोबा आणि वडील दोघांनीही भूतकाळात सरपंच पदाच्या माध्यमातून गांवाच्या विकासकामात हातभार लावला होता. विपुल यांनी कृषी पदवी व एम.बी.ए. चे श...

इंद्रेश्वर चौकात स्वच्छतागृहाअभावी नागरिकांची उघड्यावरच लघवी; महिलांसाठी ठरत आहे त्रासदायक

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) शनिवार (२३ जानेवारी)  : अनेक मंदिरे, न्यायालय (कोर्ट), तलाठी कार्यालये, दवाखाने आणि बाजारपेठेमुळे नेहमीच वर्दळ असणाऱ्या पांधारानाला (इंद्रेश्वर चौक) परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह (मुतारी) नसल्याने नागरिक रस्त्याकडेला अस्वच्छ, उघड्या आणि एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नाला सदृश गटारीचाच स्वच्छतागृह (मुतारी) म्हणून उपयोग करत आहेत. स्वच्छतागृहाअभावी नाईलाजास्तव नागरिक उघड्यावरच लघवी करण्याचे लज्जास्पद कृत्य करत आहेेेत. त्यामुळे नेहमी नागरीकांनी गजबजलेल्या इंद्रेश्वर चौकातून ये जा करणाऱ्या महिलांसाठी ही बाब त्रासदायक ठरत आहे. इंदापूर शहरामध्ये स्वच्छतागृहांची (मुतारी) समस्या इंदापूरकरांच्या अंगवळणी पडली आहे. ही समस्या खराब रस्त्यांएवढीच गंभीर देखील आहे. दीडशेच्या आसपास खेडी आणि अनेक वाडवस्त्यांवरून नागरिकांना या ना त्या कारणाने इंदापूर शहरामध्ये यावे लागते. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना स्वच्छतागृहाची गरज पडल्यास त्यांनी जायचे कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला नसेल तरच नवल. 'महिलांसाठी देखील स्वच्छतागृह असावे' या कल्पने...

इंदापूर पोलीस पुन्हा चर्चेत; जबरदस्ती घरात घुसून महिलेशी असभ्य वर्तन व धमकी दिल्याचा पोलीसांवर आरोप

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) इंदापूर (२० जानेवारी)  : इंदापूर पोलीस ठाणे या ना त्या कारणाने सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत असून, इंदापूर पोलीसांनी घरामध्ये कोणीही नसताना जबरदस्ती घरात घुसून असभ्य वर्तन केल्याचा व उचलून घेऊन जाण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप सिमरन वसीम शेख या महिलेने इंदापूर पोलीसांवर केला आहे. इंदापूर शहरातील शेखमोहल्ला याठिकाणी मंगळवारी (१९ जानेवारी) दुपारी ३ च्या सुमारास हा प्रकार घडला असून, इंदापूर पोलीस ठाण्यात तब्बल ३ तास विनवण्या करून देखील सदर पोलीसांविरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली नसल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. तर या महिलेच्या पतीने आपल्यालाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप इंदापूर पोलीसांवर केला आहे. इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराविरोधातील वादळ अजून शमले नसताना, घरात एकटी असताना जबरदस्ती घरात घुसून इंदापूर पोलीसांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा गंभीर आरोप सिमरन वसीम शेख यांनी इंदापूर पोलीसांवर केला आहे. इंदापूर शहरातील शेखमोहल्ला याठिकाणी आपल्या कुट...

घोडेबाजार इंदापूरात चर्चा मात्र देशभरात

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक) रविवार (१७ जानेवारी) : इंदापूरमध्ये सुरू असलेला घोड्यांचा बाजार देशभरातील घोडे शौकिनांसाठी मेजवानी ठरत असून, घोडेबाजार इंदापूरात चर्चा मात्र देशभरात सुरू आहे. या घोडेबाजाराच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इंदापूरचे नांव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून, कोट्यावधींची उलाढाल होत असलेल्या या घोडे बाजारात ५० हजारांपासून २५ लाखांपर्यंत किंमतीचे मारवाड, पंजाब, अरबी, जातीच्या घोड्यांसह अनेक जातीचे व गुणांचे घोडे विक्रीसाठी इंदापूरमध्ये दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील हा एकमेव घोडेबाजार असून, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होणारा हा घोडेबाजार १० फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. हौसेला मोल नसते असे नेहमीच म्हटले जाते. स्वतः उत्तम घोडेस्वार व घोड्यांचे शौकीन असलेले इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आप्पासाहेब जगदाळे व व्हाईस चेअरमन यशवंत माने यांच्या प्रयत्नांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून होत असलेल्या या घोडे बाजारामध्ये घोडे शौकिनांची होत असलेली गर्दी पाहून देखणा, तगडा आणि ऐटबाज घोडा आपल्याकडेही असा...

हे आहेत इंदापूर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीमधील सर्वात जास्त उच्च शिक्षित उमेदवार

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) गुरुवार (१४ जानेवारी) : उद्या (१५ जानेवारी) होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत इंदापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायत निवडणुक लढवणारे २९ वर्षाचे विपुल बबन वाघमोडे हे इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक लढवणारे सर्वात जास्त शिक्षित उमेदवार असणार आहेत. काटी ग्रामपंचायतच्या १३ जागांसाठी लढत होणार असून, एकूण २७ उमेदवार रिंगणात आहेत. पैसा, गुन्हेगारी आणि सत्तेचे साटेलोटे मोडीत काढून शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विपुल बबन वाघमोडे हे भरणे गटाचे उमेदवार मानले जात असून, सामाजिक कामांच्या जोरावर ते प्रभाग क्रमांक ५ मधून आपले नशीब आजमावत आहेत. उद्या महाराष्ट्रातील १४,२३४ ग्रामपंचायतीच्या जागांसाठी निवडणुक होणार असून, इंदापूर तालुक्यात ५५६ जागांसाठी १३५२ उमेदवार रिंगणात आहेत. अशिक्षित, पैशांचा बाजार, भ्रष्टाचार, अपप्रवृत्ती यांमुळे गुन्हेगारीचा अड्डा बनत चाललेल्या राजकारणाच्या गंदेगारीपासून दूर राहणारे उच्चशिक्षित तरुण या क्षेत्राला समाजकारणासाठी उत्तम पर्याय मानून आता या क्षेत्रात येऊ लागली आहे...

राजकीय अस्तित्वासाठी हर्षवर्धन पाटील यांना उद्याची ग्रामपंचायत निवडणुक महत्वाची

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) बुधवार (१३ जानेवारी) : शुक्रवारी (१५ जानेवारी)  होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. वरकरणी या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा हे समीकरण दिसत असले तरी इंदापूर तालुक्यात मात्र आजी मंत्री दत्तात्रय भरणे विरुद्ध माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असेच काहीसे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभूत झाल्यामुळे इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी व भविष्यातील समिकरणांसाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी ही निवडणुक फार महत्वाची ठरणार आहे. इंदापूर तालुक्यात एकूण ११५ ग्रामपंचायती असून, मुदत संपलेल्या ६० ग्रामपंचायतींपैकी ५७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे.  या निवडणुकीत ६० ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या भिगवण ग्रामपंचायतीसह, विधानसभेवर प्रभाव टाकू शकणाऱ्या निमगांव, वालचंदनगर अशा अनेक ग्रामपंचायतींचा देखील समावेश आहे. पैकी ३ ग्रामपंचायतीसह (जाचकवस्ती, कचरवाडी, जाधववाडी) ५४ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे ५५६ जागांसाठी १३५२ उमेदवार शुक्रवारी आपले नशीब आज...

पी. आय. नारायण सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराचे शिंतोडे राज्यमंत्र्यांच्या कॉलरपर्यंत

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) इंदापूर (१२ जानेवारी) : रविवारी (१० जानेवारी) इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर खंडणी मागीतल्याचा व न दिल्याने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाच्या कार्यवाहीच्या मागणीसाठी इंदापूरचे आमदार व सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणासाठी बसलेल्या महिलेकडून भरणे यांना धक्काबुक्की करणारा व्हिडीओ महाराष्ट्रभर वायरल झाला होता. हे प्रकरण राज्यमंत्र्यांनी संयमाने हाताळले असले तरी सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराचे शिंतोडे कळत नकळत भरणेंच्या कॉलरपर्यंत  पोहोचणे फार गंभीर बाब आहे.  सारंगकर यांचे इंदापूरमध्ये अधिक वास्तव्य भरणे यांना राजकीयदृष्ट्या आता परवडणार नसल्याने भरणे हे सारंगकर यांची उचलबांगडी कधी करणार याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. रेडणी (ता. इंदापूर) गांवचे माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल चव्हाण व सचिन तरंगे यांच्याकडून ५ लाखांची खंडणी मागीतल्याचा व खंडणी न दिल्याने दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप चव्हाण...

बर्ड फ्लू नक्की आहे तरी काय?

इमेज
देशात कोरोनाचे संकट संपले नसताना देशावर बर्ड फ्लू'चे संकट घोंगाऊ लागले आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानसह एक एक राज्य याच्या लपेट्यात येऊ लागले आहे. महाराष्ट्रात अद्याप हे संकट आलेले नाही. महाराष्ट्रासह बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. बर्ड फ्लू नक्की आहे तरी काय? बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू किंवा एवियन एन्फ्लुयेन्झा (avian influenza) असेही म्हटले जाते. हा पक्षांच्या लाळ, विष्ठा किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते. बर्ड फ्लूच्या नावातील ‘H’,’N’चा अर्थ काय? पक्षांमध्ये पसरणाऱ्या फ्लूचे म्हणजेच  बर्ड फ्लू चे अनेक उपप्रकार आहेत. त्यातील H म्हणजे हेमाग्युलेटीन (Hemagglutinin) आणि N म्हणजे न्यूरामिन...

कालठण नं.१ येथील शिवमंदिरात नंदीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना

इमेज
चेतन चव्हाण (संपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) गुरुवार (७ जानेवारी)  : कालठण नं.१ (ता. इंदापूर) येथील पोपटराव कदम यांच्या शेतातील शिवमंदिरामध्ये महादेवाच्या नंदीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना कदम परिवाराच्या वतीने नुकतीच करण्यात आली.  मंदीरासमोर होम व रूद्राभिषेक करून नंदीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ भक्तांना महाप्रसाद भोजन कार्यक्रम संपन्न झाला. तत्पुर्वी नंदीच्या मुर्तीची विधीवत पुजा करून फुलांनी सजविलेल्या बैलगाडीत नंदीची मुर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर वाद्याच्या गजरात बैलगाडीतुन पारंपारिक पद्धतीने कालठण गावातुन मिरवणुक काढण्यात आली.  यावेळी पंचक्रोशितील ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संखेने मीरवणुकीत सहभागी झाले होते. हे देखील वाचा - इंदापूर येथील सर्वरोग निदान शिबिरात ४६३ लाभार्थींचा सहभाग मंदीरासमोर होम व रूद्राभिषेक करून नंदीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ भक्तांना महाप्रसाद भोजन कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी कदम परिवार व शिवाजी कोळी परिवाराचे विषेश सहकार्य लाभले. यावेळी कालठण नं.१ च्या पोलीस पाटील पुनम जावळे, ...

इंदापूर येथील मोफत सर्वरोगनिदान शिबीरात ४६३ शिबीरार्थीचा सहभाग; मोफत तपासणी व औषध वाटप

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) मंगळवार (५ जानेवारी)  : सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंती निमीत्त इंदापूर येथील राष्ट्रपिता महात्मा फुले बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने इंदापूर येथील संत सावतामाळी मंगल कार्यालयामध्ये ३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत मोफत सर्वरोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ४६३ शिबीरार्थीं सहभागी झाले होते. सदर शिबीरार्थींची शिबीरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तर विविध आजारावरील औषधांचे वाटप मोफत करण्यात आल्याची माहीती आयोजक पांडुरंग शिंदे यांनी दीली. शिबीराचे उदघाटन राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी अकलुज येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डाॅ. एम. के. इनामदार, नेत्ररोगतज्ञ डाॅ. महाविर गांधी, अस्थिरोगतज्ञ डाॅ. वैभव गांधी, फॅमीली फिजीशियन डाॅ. दत्ता गार्डे, त्वचारोग तज्ञ डाॅ.कुलकर्णी, आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार केंगार हे प्रमुख उपस्थित होते. हे देखील वाचा - मृतांच्...

मृतांच्या अंगावरील ९ तोळे सोने नातेवाईकांच्या स्वाधीन करणाऱ्या ऍम्ब्युलन्स चालकाचा इंदापूर शिवसेनेकडून सन्मान

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) इंदापूर (४ जानेवारी) : काल (३ जानेवारी) सकाळी विठ्ठलवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) गांवच्या हद्दीत ट्रक आणि कारची समोरसमोर धडक होऊन पांडुरंग सीताराम ताथवडे (वय ५८ वर्ष) आणि रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५० वर्ष) या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताचे प्रत्यक्षदर्शी व मृतांच्या अंगावरील अंदाजे ९ तोळे सोने आणि ३५ हजार रोख रक्कम त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करणारे रुग्णवाहिका चालक 'नितीन खिलारे' यांचा इंदापूर शहर शिवसेनेच्या वतीने आज (४ जानेवारी) सत्कार व ५ हजार रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. रविवारी (३ जानेवारी) सकाळी ७ वा. ४५ मी. सुमारास सैन्यात शहीद झालेल्या आपल्या सहकारी मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी अकलूज येथे आपल्या नेक्साॅन कंपनीच्या कारमधून (एमएच ४२ आरएफ २६६२) जात असताना केंदूर पाबळ (ता. शिरूर, जि. पुणे) येथील सेवानिवृत्त माजी सैन्य अधिकारी (सुभेदार मेजर) पांडुरंग सीताराम ताथवडे व त्यांच्या पत्नी रुक्मिणी पांडुरंग ताथवडे यांचा विठ्ठलवाडी गावाच्या हद्दीत अपघात होऊन मृत्यू झाला होता. योगायोगाने अपघातानंतर अवघ्या काही ...