इंदापूर येथील मोफत सर्वरोगनिदान शिबीरात ४६३ शिबीरार्थीचा सहभाग; मोफत तपासणी व औषध वाटप
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)
मंगळवार (५ जानेवारी) : सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंती निमीत्त इंदापूर येथील राष्ट्रपिता महात्मा फुले बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने इंदापूर येथील संत सावतामाळी मंगल कार्यालयामध्ये ३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत मोफत सर्वरोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ४६३ शिबीरार्थीं सहभागी झाले होते. सदर शिबीरार्थींची शिबीरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तर विविध आजारावरील औषधांचे वाटप मोफत करण्यात आल्याची माहीती आयोजक पांडुरंग शिंदे यांनी दीली.
शिबीराचे उदघाटन राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी अकलुज येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डाॅ. एम. के. इनामदार, नेत्ररोगतज्ञ डाॅ. महाविर गांधी, अस्थिरोगतज्ञ डाॅ. वैभव गांधी, फॅमीली फिजीशियन डाॅ. दत्ता गार्डे, त्वचारोग तज्ञ डाॅ.कुलकर्णी, आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार केंगार हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणाच्या अतुलनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढताना, न्यायव्यवस्थेने स्त्रीयांना अज्ञानाच्या गडद अंधारात लोटले असताना त्यांना शिक्षणाची कवाडे उघडून प्रतिकुल परिस्थीतीशी दोन हात करत ज्ञानाची ज्योत पेटविण्याचे महान कार्य सावित्रीबाई फुले यांनी केल्याने आज त्यांची १९० वी जयंती साजरी करताना सावीत्रीबाई फुले यांच्या कार्याचा अभिमान वाटत असल्याचे मत व्यक्त केले.
मोफत तपासणी शिबीरासाठी इंदापूर येथील डाॅ. नामदेव गार्डे, डाॅ. अनिल पुंडे, डाॅ. श्रेणीक शहा, डाॅ.संदेश शहा, डाॅ. बाळासाहेब राऊत, कॅप्टन डाॅ. शिरिष साळुंके, डाॅ. मनिषा बाबर, डाॅ. सचिन बाबर, डाॅ. पुनम शिंदे, डाॅ. सागर दोशी, डाॅ. समीर मुलाणी, डाॅ. श्रद्धा काळे, डाॅ. शिवाजीराव खबाले, डाॅ. अरूण गार्डे, डाॅ. यतीन शिंदे, डाॅ. प्राची देवकर, डाॅ. अमीत देवकर, डाॅ. मीलिंद खाडे, डाॅ. ऋषिकेश गार्डे, डाॅ. अनिल पेठकर, डाॅ. रियाज पठाण इ. तज्ञ डाॅक्टरांनी शिबीरात सहभागी होउन शिबीरार्थींची मोफत तपासणी करून योगदान दीले.
युवराज मस्के, बाळासाहेब व्यवहारे, बाबासाहेब भोंग, बाबा जाधव, गणेश जाधव, अवधुत पवार, दादा बोराटे, आप्पा शिंदे, विशाल फोंडे, गोविंद बोराटे, महेश ढगे, चंद्रकांत शेंडे, आशितोष शिंदे, सचिन शिंदे, मयुर शिंदे, मोहन शिंदे, नितिन पांढरे, बाळासाहेब धोत्रे, अमोल राऊत, नवनाथ शिंदे, शेखर राऊत इत्यादींनी कार्यक्रमात महत्वाचे योगदान दीले. सुत्रसंचलन सुधाकर बोराटे यांनी केले तर आभार मेजर स्वप्निल शिंदे यांनी मानले.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा