कालठण नं.१ येथील शिवमंदिरात नंदीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना

चेतन चव्हाण (संपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

गुरुवार (७ जानेवारी) : कालठण नं.१ (ता. इंदापूर) येथील पोपटराव कदम यांच्या शेतातील शिवमंदिरामध्ये महादेवाच्या नंदीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना कदम परिवाराच्या वतीने नुकतीच करण्यात आली. मंदीरासमोर होम व रूद्राभिषेक करून नंदीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ भक्तांना महाप्रसाद भोजन कार्यक्रम संपन्न झाला.

तत्पुर्वी नंदीच्या मुर्तीची विधीवत पुजा करून फुलांनी सजविलेल्या बैलगाडीत नंदीची मुर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर वाद्याच्या गजरात बैलगाडीतुन पारंपारिक पद्धतीने कालठण गावातुन मिरवणुक काढण्यात आली.  यावेळी पंचक्रोशितील ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संखेने मीरवणुकीत सहभागी झाले होते.

हे देखील वाचा - इंदापूर येथील सर्वरोग निदान शिबिरात ४६३ लाभार्थींचा सहभाग

मंदीरासमोर होम व रूद्राभिषेक करून नंदीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ भक्तांना महाप्रसाद भोजन कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी कदम परिवार व शिवाजी कोळी परिवाराचे विषेश सहकार्य लाभले. यावेळी कालठण नं.१ च्या पोलीस पाटील पुनम जावळे, शहाजी कदम, सतिश जावळे, मयुर कदम, अमोल कदम, रविंद्र कदम, शरद कदम, शिवाजी पवार, राजेंद्र कोळी, सुनिल राऊत यांचेसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट