हे आहेत इंदापूर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीमधील सर्वात जास्त उच्च शिक्षित उमेदवार

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

गुरुवार (१४ जानेवारी) : उद्या (१५ जानेवारी) होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत इंदापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायत निवडणुक लढवणारे २९ वर्षाचे विपुल बबन वाघमोडे हे इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक लढवणारे सर्वात जास्त शिक्षित उमेदवार असणार आहेत. काटी ग्रामपंचायतच्या १३ जागांसाठी लढत होणार असून, एकूण २७ उमेदवार रिंगणात आहेत. पैसा, गुन्हेगारी आणि सत्तेचे साटेलोटे मोडीत काढून शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विपुल बबन वाघमोडे हे भरणे गटाचे उमेदवार मानले जात असून, सामाजिक कामांच्या जोरावर ते प्रभाग क्रमांक ५ मधून आपले नशीब आजमावत आहेत.

उद्या महाराष्ट्रातील १४,२३४ ग्रामपंचायतीच्या जागांसाठी निवडणुक होणार असून, इंदापूर तालुक्यात ५५६ जागांसाठी १३५२ उमेदवार रिंगणात आहेत. अशिक्षित, पैशांचा बाजार, भ्रष्टाचार, अपप्रवृत्ती यांमुळे गुन्हेगारीचा अड्डा बनत चाललेल्या राजकारणाच्या गंदेगारीपासून दूर राहणारे उच्चशिक्षित तरुण या क्षेत्राला समाजकारणासाठी उत्तम पर्याय मानून आता या क्षेत्रात येऊ लागली आहेत. काटी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी रिंगणात असलेल्या २७ उमेदवारांमध्ये विपुल बबन वाघमोडे हे २९ वर्षाचे तरुण उमेदवार असून पुणे आणि राहुरी याठिकाणी त्यांनी बी.एस.सी. ऍग्री व एम.बी.ए. चे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे ते इंदापूर तालुक्यातील एकूण उमेदवारांमध्ये सर्वात जास्त शिक्षित उमेदवार ठरले आहेत.

हे देखील वाचा - हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अस्तित्वासाठी उद्याची ग्रामपंचायत निवडणुक महत्वाची

आपल्या वडिलांकडून राजकारण व समाजकारणाचे धडे घेतलेले नम्र स्वभावी आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारे विपुल वाघमोडे हे लाखेवाडी येथील विद्यानिकेतन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गांवात काही काळापुरता का होईना दारू सारख्या विषारी रोगाचा संसर्ग थांबला होता. ग्रीनकाटी सारख्या वृक्षलागवडीच्या सामाजिक उपक्रमात देखील हिरीरीने सहभाग घेतात. तर भविष्य घडवणारे शिक्षक आणि उद्याचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कै. बबनराव भगवान वाघमोडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी ते आदर्श शिक्षक व १० वी आणि १२ वी मध्ये प्रथम ३ क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देत असतात. राजकारणातील हे बदलते समिकरण देशाच्या उज्वल भविष्याचे संकेतच म्हणावे लागेल.

गुन्हेगार आणि राजकारण यांच्यातील साटेलोटे ही देशातील अत्यंत मोठी समस्या असून, पैसा, गुन्हेगार आणि सत्तेच्या संगनमतामुळे भ्रष्टाचार बळावत असून शासनाच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्याआधीच दम तोडत आहेत. समाजकारणाला राजकारणाची जोड आणि उच्चशिक्षित तरुणांच्या सहभागाशिवाय वरील चित्र बदलणे अशक्य आहे - विपुल बबन वाघमोडे




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट