आज मध्यरात्रीपासून निर्बंध आणखी कडक होणार; स्थानिक प्रशासनालाही कडक निर्बंध लावण्याची मुभा
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, ओमायक्राॅनचे संकटही आता गडद होऊ लागले आहे. सध्या देशात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ८२,००० च्या वर गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात १० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन व कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली होती. राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने गुरुवारी (३० डिसेंबर) परिपत्रक जारी करत राज्यातील निर्बंध आणखी कडक केले असून, सरकारच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. तर स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप निर्णय घेत कडक निर्बंध लागू करण्याची मुभा देण्यात आली आहे. हे देखील वाचा - कुत्रे व डुकरे खात आहेत मृतांचे अवशेष; इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील प्रकार या निर्बंधांमध्ये, बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकार...