इंदापूर शहरातून होणाऱ्या अवजड वाहतूक आणि ऊस वाहतुकीला लगाम घाला - राष्ट्रवादीची मागणी
प्रशासनाने अपघातास कारणीभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी आंदोलन करणार मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१६ डिसेंबर) :- इं दापूर शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांचा आणि धोकादायक ऊस वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, गुरुवारी (१४ डिसेंबर) खुळे चौकात एका अवजड वाहनाने दुचाकीवर चाललेल्या दोघा शाळकरी विद्यार्थ्यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभाग आक्रमक झाला असून, इंदापूरचे तहसीलदार, नगरपरिषद आणि पोलिसांना निवेदन देत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करण्यासह, शहरातून जाणाऱ्या बेलगाम उसाच्या ट्रॅक्टर्सना वेगाची मर्यादा घालणे, तसेच बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावर शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, खाजगी व शासकीय दवाखाने, बस स्थानक इ. कारणांमुळे नागरिकांची, विशेषतः विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातून होणारी अवजड वाहतूक, नियमबाह्य ...