पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आज मध्यरात्रीपासून निर्बंध आणखी कडक होणार; स्थानिक प्रशासनालाही कडक निर्बंध लावण्याची मुभा

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क मागील काही दिवसांपासून भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, ओमायक्राॅनचे संकटही आता गडद होऊ लागले आहे. सध्या देशात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ८२,००० च्या वर गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात १० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन व कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली होती. राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने गुरुवारी (३० डिसेंबर) परिपत्रक जारी करत राज्यातील निर्बंध आणखी कडक केले असून, सरकारच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. तर स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप निर्णय घेत कडक निर्बंध लागू करण्याची मुभा देण्यात आली आहे. हे देखील वाचा - कुत्रे व डुकरे खात आहेत मृतांचे अवशेष; इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील प्रकार या निर्बंधांमध्ये, बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकार...

शवविच्छेदन केलेल्या मृतांचे अवशेष उघड्यावर जाळले ही वस्तुस्थिती; अवशेषांची विल्हेवाट नियमबाह्य पद्धतीने - इंदापूर उपजिल्हा रुग्णालय प्रकरणावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नांदापूरकर यांचे स्पष्टीकरण

इमेज
अवशेष जाळलेल्या ठिकाणाची पाहणी करताना डॉ. नांदापूरकर पारदर्शी चौकशीसाठी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधितांवर निलंबनाची कारवाई होणे गरजेचे. चेतन च व्हाण (संपादक) इंदापूर (२९ डिसेंबर) :- इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या शवविच्छेदन गृहाबाहेरच शवविच्छेदन करण्यात आलेल्या मृत व्यक्तींचे अर्धवट जळालेले अवशेष भटके कुत्रे व डुकरे खात असल्याचा निंदनीय प्रकार सोमवारी (२७ डिसेंबर) उघडकीस आला होता. अवशेष उघड्यावर जाळले ही वस्तुस्थिती असल्याचे व नियमानुसार अवशेषांची विल्हेवाट लावल्याचे प्राथमिकत: दिसत नसल्याचे सांगत, पुणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक  नांदापूरकर  यांनी लवकरच चौकशी पूर्ण करून अहवाल वरिष्ठांना सादर करू, तदनंतर कारवाईबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असे म्हटले आहे. काल (२८ डिसेंबर) ते घटनेची चौकशी करण्यासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे आले होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन गृहाबाहेरच शवविच्छेदन करण्यात आलेल्या व्यक्तींचे शरीराचे अर्धवट जाळण्यात आले...

सरडेवाडी - राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला ग्रामसंघ लावणार ५०० झाडे

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क सरडेवाडी (२६ डिसेंबर) :-  माझी वसुंधरा अभियानाच्या दुसऱ्या टप्पात सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला ग्रामसंघाने ५०० झाडे लावण्याची जबाबदारी घेतली असल्याची माहिती सरडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम जानकर यांनी दिली आहे. काल (२४ डिसेंबर) ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम जानकर, उपसरपंच हनुमंत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्या प्रियंका शिद व वैशाली शिद यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन या कौतुकास्पद मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला ग्रामसंघाच्या प्रत्येक महिला सदस्याने एक झाड लावून ते जगवण्याची हमी घेतली असून, या मोहिमेसाठी लागणारी रोपे सरडेवाडीतील अंकुर रोपवाटिकेतून उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी बोलताना सरपंच जानकर यांनी, माझी वसुंधरा अभियानांतर्गत असणारे सर्व निकष आम्ही तत्परतेने पूर्ण करणार असून, महिला ग्रामसंघाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. आम्ही सरडेवाडी गाव ऑक्सिजन पार्क होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. ग...

उद्या विधानभवनावर धडकणार लहुजी शक्ती सेनेचा महामोर्चा

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२६ डिसेंबर)  :- अनुसूचित जातीकरिता असलेले एकत्रित आरक्षण अ,ब,क,ड नुसार वर्गीकरण करण्यात यावे, या व अशा विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचा, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला भव्य महामोर्चा मुंबईतील विधानभवनावर २७ डिसेंबर रोजी धडकणार आहे. १९ डिसेंबर रोजी पुण्यातील आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीपासून संघटनेचे हजारो कार्यकर्ते पायी मुंबईकडे रवाना झाला असून, काल (२५ डिसेंबर) हा महामोर्चा वाशी (नवी मुंबई) या ठिकाणी मुक्कामास होता, अशी माहिती लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी  मुत्सुद्देगिरी दिली  आहे. मातंग समाज अनेक वर्षापासुन अनुसुचित जातीकरीता एकत्रित असलेल्या १३% आरक्षणाची अ,ब,क,ड नुसार वर्गवारी करण्याची, तसेच अ. जा करीता एकत्रित असलेल्या सर्व योजनांची अ,ब,क,ड नुसार वर्गवारी करण्यात यावी ही मागणी घेऊन रस्त्यावर लढा देत आहे. महाराष्ट्रात अनुसुचित जाती गटातील ५९ जातींना १३% एकत्रित आरक्षणाची तरतुद आहे. मात्र आरक्षणाचा सर्वाधिक लाभ शैक्षणिकदृष्टया, आर्...

ॲड. राहुल मखरे यांच्या टोल बंद आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर टोल व्यवस्थापन वठणीवर

इमेज
नागपूरे यांना नियुक्तीपत्र देताना टोलचे अधिकारी, पोलीस निरीक्षक मुजावर, ऍड. राहुल मखरे, नगरसेवक पोपट शिंदे आणि इतर वैचारिक मतभेद बाजूला सारून आंदोलनाला मिळाला सर्वपक्षीय पाठिंबा मुत्सुद्देगिरी न्युज नेटवर्क इंदापूर (२१ डिसेंबर) :- २७ नोव्हेंबरच्या रात्री भीमानगर पुलावर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेला सरडेवाडी टोल प्रशासनाचा मनमानी कारभार व निष्काळजीपणा जबाबदार असल्याच्या आरोपांना काही दिवसच ओलांडले असताना, आता सूचना न देता कामावरून काढल्याच्या मुद्द्यावरून इंदापूर शहरातील गणेश नागपूरे या टोल कर्मचाऱ्याने कामावरून बडतर्फ केल्याच्या कारणास्तव टोल प्रशासनाविरोधात शनिवारी (१८ डिसेंबर) आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला होता. या आंदोलनाला सामान्यांचा मसिहा ठरत असलेल्या ॲड. राहुल मखरे यांनी रविवारी (१९ डिसेंबर) दिलेल्या टोल बंद आणि बुम तोड आंदोलनाच्या इशाऱ्याची जोड मिळताच वठणीवर आलेल्या टोल प्रशासनाने आपली चूक मान्य करत विनाशर्त नागपूरे यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले आहे. अपवादात्मक घटना वगळता इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यां...

ग्रामस्वच्छता चळवळीचे आद्यजनक संत गाडगे महाराज - स्वाती लोंढे-चव्हाण

इमेज
मधोमध संत गाडगेबाबा, उजवीकडे डॉ. आंबेडकर, डावीकडे कर्मवीर भाऊराव पाटील मुत्सुद्देगिरी विशेष स्वच्छतेची आद्यचळवळ महाराष्ट्रात १८ व्या शतकात ज्यांनी सुरू केली त्या महान समाजप्रबोधनकार, लोकसंत, वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त ही शब्द सुमनांजली... ज्या काळात संपूर्ण देशात अनिष्ट रूढी-परंपररांनी थैमान घातलं होतं. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं साम्राज्य अस्तित्वात होत. त्या काळात किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन, जनजागृती करण्याचे काम गाडगेबाबांनी केलं. संत गाडगेमहाराज एक चालते बोलते सामाजिक विद्यापीठ होते. त्यांनी मांडलेला स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचा सिद्धांत आपल्याला आजही वैज्ञानिक दृष्टीकोन देत आहे. स्वच्छतेतूनच माणसाचा शाश्वत विकास होऊ शकतो, हे संत गाडगेबाबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. स्वच्छतेला चळवळीचे स्वरूप खर्‍या अर्थाने गाडगे महाराजांनी दिले. आजघडीला संपूर्ण देशात चालू असलेल्या "स्वच्छ भारत" अभियानाचा पाया अठराव्या शतकात गाडगेमहाराजांनीच घातला होता, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. दिवसभर गावस्वच्छता करणाऱ्या गाडगे बाबांनी रात्रीच्यावेळी ...

शरीर सौष्ठव स्पर्धेत इंदापूर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

इमेज
विजेत्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य व इतर आंतर महाविद्यालयीन  सर्धेत ५ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटात मारली बाजी मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२० डिसेंबर) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत राजगुरूनगर (ता. खेड) येथील हुतात्मा महाविद्यालयात १६ डिसेंबर रोजी पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तब्बल ५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत वेगवेगळ्या गटात बाजी मारली आहे. यामध्ये ५५-६० किलो वजन गटात निलेश ढावरे याने प्रथम क्रमांक, तर सरफराज मणेरी याने द्वितीय क्रमांक पटकावला. ६५-७० किलो वजन गटात मोहम्मद सैफ काझी याने प्रथम, तर तुषार ढगे याने द्वितीय क्रमांक पटकावला. ७०-७५ किलो वजन गटात तेजस शिंदे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इतिहासात शरीर शौष्ठव स्पर्धेत एकाचवेळी ५ जणांनी बाजी मारल्याची ही पहिलीच वेळ असून, आज (२० डिसेंबर) रोजी पुणे विद्यापीठ अंतर्गत श्रीरामप...

इंदापूर नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना पक्की घरे मिळणार?

इमेज
सफाई कामगारांचं पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण होणार? मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१८ डिसेंबर) :- कुणी घर देतं कारे घर ! एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या मायेपासून, देवाच्या दयेपासून, डोंगरा डोंगरात हिंडत आहे.. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे...या नटसम्राट चित्रपटातील नाना पाटेकरांप्रमाणे घर आणि मायेसाठी आर्त हाक इंदापूर शहरातील घाणेरड्या गटारींशी, मलमुत्रांशी आणि अस्वच्छतेशी दोन हात करत शहरवासियांची दुर्गंधी व अनेक आजारांपासून बचाव करणारे इंदापूर नगरपरिषदेचे सफाई कामगार देखील अनेक वर्षांपासून लगावत आहेत. यांची मागणी आहे केवळ पक्क्या आणि हक्काच्या घरासाठी. होय केवळ पक्क्या आणि हक्काच्या घरासाठी. इंदापूर नगरपरिषदेने संघटित परिश्रमाच्या जोरावर केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अनेकवेळा बाजी मारली आहे. मात्र, साहजिकच यामध्ये मोलाचा वाटा आहे तो तुम्हा आम्हाला दुर्गंधी आणि अस्वच्छतेपासून  वाचणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा. कचरामुक्त शहराच्या स्पर्धेत तब्बल चार वेळा ३ स्टार मानांकन प्राप्त करून देशपातळीवर इंदापूरचे नाव गाजवणाऱ्या नगरपरिषदेला शासनाकडून...

इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी लसीचा दुसरा डोस न घेतल्यास होणार कारवाई

इमेज
बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्यातील नागरिकांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१२ डिसेंबर) :- कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या दुसऱ्या डोसवरून इंदापूर तालुक्यासह बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील नागरिकांना कारवाईचा इशारा दिला आहे. या तालुक्यातील नागरिकांनी कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसला प्रतिसाद न दिल्यास येणाऱ्या बैठकीत यावर कारवाईबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल, कारण तज्ञांनी 'काहीही करा पण नागरिकांना दुसरा डोस द्या' असा सल्ला दिला असल्याचे मत अजित पवार यांनी पुण्यात एका ठिकाणी बोलताना व्यक्त केले आहे. पुण्यामध्ये पहिला डोस १०० टक्क्यांच्या जवळपास झाला आहे. परंतु दुसऱ्या डोसचं प्रमाण फार कमी असल्याचे नमुद करताना अजित पवार यांनी, इंदापूर तालुक्यासह बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यामध्येही दुसऱ्या डोसची पुरेशी संख्या पाहायला मिळत नसल्याचे म्हटले आहे. आम्ही पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अ...

इंदापूरच्या ऐतिहासिक हजरत चाँदशाहवली दर्ग्याची आणि उरुसाची वैशिष्ट्ये प्रत्येक इंदापूरकरांना माहित हवी (विशेष लेख)

इमेज
रोषणाई करण्यात आलेली चाँदशाहवली यांची दर्गाह सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान, इंदापूरच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासाचे सुवर्ण पान आणि एकूणच इंदापूरचे वैभव असलेल्या ऐतिहासिक अशा हजरत चाँदशाहवली दर्ग्याच्या ४५७ व्या उरूसाला कालपासून (११ डिसेंबर, मार्गशीर्ष ८) सुरुवात झाली. भारतीय पंचांगातील मार्गशीर्ष या नवव्या महिन्यात साजरा केला जाणारा हा उरूस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही शासनाच्या नियमांनुसार आणि अत्यंत साध्यापणाने मात्र पारंपारिक पद्धतीने साजरा होत आहे. काल संदलचा कार्यक्रम पार पडला, आज उरुसाचा मुख्य दिवस (१२ डिसेंबर, मार्गशीर्ष ९) असून, उद्या (१३ डिसेंबर, मार्गशीर्ष १०) झेंड्याच्या (ग्रामप्रदक्षिणा) निमित्ताने हा उरुसोत्सव इंदापूर शहरात एकूण तीन दिवस चालणार आहे. या ऐतिहासिक दर्ग्याचा उरूस कसा पार पडतो, काय काय आहेत याची ठळक वैशिष्ट्ये याबाबत माहिती देणारा मासिक मुत्सुद्देगिरीचे उपसंपादक समीर सय्यद यांचा हा विशेष लेख. दर्गाह कोणी आणि कोणत्या साली बांधली? चाँदखान शाह असे मूळ नांव असलेल्या या वलींची दर्गाह कोणी आणि कोणत्या साली बांधली याबाबत सबळ पुरावे आमच्याकडे उपलब्ध न...

श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंतीनिमित्त निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप

इमेज
रुग्णांना वाटप करताना  अखिल तेली समाज संघटना आणि तिळवण तेली समाजाचे पदाधिकारी मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१० डिसेंबर) :- तुकारामांची गाथा लिहून काढली | म्हणून अवतरली भूमीवरी || तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवल्यानंतर ते पुन्हा शब्दांत उतरवण्याचे महत्वपूर्ण कार्य करणारे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंतीनिमित्त काल (९ डिसेंबर) निमगाव केतकी येथे अखिल तेली समाज संघटना आणि तिळवण तेली समाजाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. सोबतच सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट मंदिरामध्ये, निमगाव केतकी येथील पोलीस ठाणे व ग्रामपंचायत कार्यालयामध्येही महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तेथे पेढे वाटप करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. तुकारामांच्या गाथेला मूर्त स्वरूप देण्याबरोबरच दीपिका, शंकर दीपिका, घाण्याचे अभंग, योगाची वाट, निर्गुणाच्या लावण्या, पाचरीचे अभंग, तैलसिंधुसह अनेक ग्रंथांची रचना करणाऱ्या श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्य आणि प्रबोधनात व्यतिथ केले. संतांच्या विभूति | देह कष...

मागण्या मान्य झाल्याने अॅड. राहुल मखरे यांचे आंदोलन स्थगित; काय होत्या मागण्या आणि काय मिळाली आश्वासने?

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१० डिसेंबर) :- बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे यांनी, नगरपरिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसा (अनुकंपा) अधिकाराच्या पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी, मतदार याद्यांतून बोगस मतदारांना वगळण्यात यावे, वरकुटे (खुर्द) येथील ग्रामपंचायतीमध्ये कागदी भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवक व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी सोमवार (६ डिसेंबर) पासून इंदापूर नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला होता. दखल न घेतल्यास रास्ता रोको, जेलभरो आंदोलन आणि नगरपरिषदेला ताळे ठोकण्याचाही इशारा त्यांनी दिला होता. मात्र, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या पुढाकाराने मागण्यांसंबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जवळपास ५ तास झालेल्या चर्चेअंती कारवाईच्या मिळालेल्या आश्वासनानंतर अॅड. मखरे यांनी हे आंदोलन मंगळवारी (७ डिसेंबर) मागे घेतले. काय होत्या  अॅड . राहुल मखरे यांच्या मागण्या आणि काय मिळाली आश्वासने? मागणी क्र. १ - नगरपरिषदेच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वानुसार नियुक्ती मिळावी. आश्वासन -...

शेतकरी आणि महावितरण वादावर निघालेला तोडगा म्हणजे 'आजचे मरण उद्यावर ढकलले' एवढेच?

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२ डिसेंबर) :- थकीत वीज बिलापाई कृषीपंपाच्या वीज कनेक्शन तोडण्यावरून जवळपास दोन आठवडे इंदापूर तालुक्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. शेतकरी विरुद्ध महावितरण असा शिगेला पेटलेला संघर्ष तूर्तास टळला असला तरी भविष्यात हीच परिस्थिती निर्माण होणार असून, शेतकरी आणि महावितरण यांच्या दरम्यान वादावर निघालेल्या तोडग्याचा साधा नी सोप्पा अर्थ 'आजचे मरण उद्यावर ढकलले' एवढाच असल्याचे मत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना व्यक्त केले आहे. महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात विरोधात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आवाज बुलंद केला होता. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खुद्द हजारो शेतकऱ्यांसह इंदापूर येथील महावितरण कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. महावितरण अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीनंतर १९ पैकी १७ मागण्या मान्य झाल्याचे सांगत हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे एकूणच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात उठणारा शेतकऱ्यांचा आवाजही शांत झाला. मात्र, शे...