डॉ. शिरीष सुरेश साळुंके यांची सशस्त्र दलाच्या 'कॅप्टन' पदावर नियुक्ती; कमांड हॉस्पिटलमध्ये देणार वैद्यकीय सेवा

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

इंदापूर (३१ डिसेंबर) : अवघ्या काही महिन्यांतच गरिबांचे डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळवलेले इंदापूरचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष साळुंके यांची पुण्यातील सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि कमांड हॉस्पिटल (Southern Command) येथे कॅप्टन पदावर नियुक्ती झाली आहे. Service Commission या भारत सरकारच्या आयोगामार्फत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंदापूर शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी इंदापूर तालुक्यातील गोरगरीब लोकं एका तज्ञ डॉक्टरच्या सेवेपासून वंचित झाले आहेत.

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कंत्राटी बेसिसवर स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून अकरा महिने सेवा देणारे डॉ. शिरीष साळुंके यांनी थोड्या काळातच शासकीय रुग्णालयाविषयी इंदापूर तालुक्यातील गोरगरीब लोकांमध्ये विश्वास निर्माण केला होता. एरव्ही शासकीय रुग्णालयामध्ये इलाज करण्यास कमीपणा समजणाऱ्या प्रतिष्ठित लोकांचा शासकीय रुग्णालयाकडे वाढलेला कल हा त्याचाच भाग.  त्यांनी खाजगी दवाखान्यांमध्ये लाखो रुपये खर्चूनही इलाज न झालेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयातच यशस्वी उपचार केले आहेत. अनेक (Critical) किचकट केसेसही अगदी सहज हाताळल्या आहेत.

शहरात स्वतःचा खाजगी दवाखाना थाटून लाखों रुपये कमावण्याची व आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी असतानाही डॉ. साळुंके यांनी इंदापूरसह पॉंडिचेरी, मुंबई, मोहोळ, सोलापूर, बारामती, पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर अशा विविध ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली आहे. डॉ. साळुंके यांनी आपले शालेय शिक्षण इंदापूर शहरातील श्री. ना. रा. हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इंदापूर येथे पुर्ण केले. MBBS पदवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (जि. सांगली) येथून प्रथम श्रेणीने पुर्ण केली. DGO ही पदवीत्तर पदवी किंग एडवर्ड मेमोरियल (KEM हॉस्पिटल) परेल (मुंबई) येथून, तर राजीव गांधी महिला व बाल रुग्णालय येथून DNB पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले.

आता त्यांची पुण्यातील सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि कमांड हॉस्पिटल (Southern Command) येथे कॅप्टन पदावर नियुक्ती झाली आहे. Service Commission या भारत सरकारच्या आयोगामार्फत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. MBBS, DGO, DNB अशा विविध वैद्यकीय पदव्या असलेल्या डॉ. साळुंके यांनी अकरा महिने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली आहे. आता ते पुण्याच्या कमांड रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणार आहेत. त्यांची भारतीय सशस्त्र सैन्यात नियुक्ती होणे इंदापूरकरांसाठी अभिमानास्पद बाब असली तरी, इंदापूरकरांनी एक तज्ञ डॉक्टर गमावला आहे. शेवटी, प्रामाणिक सेवा करणाऱ्यांना वेळ आणि ठिकाणाचे बंधन नसते. त्यांना आयुष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा.




टिप्पण्या

  1. डॉ. शिरिष साळुंखे व त्यांच्या सर्व कुटुबियांचे हार्दिक अभिनंदन!
    त्यांचा आदर्श शासकीय रुग्णालयातील सर्व सबंधितांनी जरूर घ्यावा!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट