सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरमध्ये रक्तदान शिबिर; महिला रक्तदात्यांचाही उस्फुर्त प्रतिसाद

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 'रक्तदान जीवनदान' हे महारक्तदान अभियान राबविण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने आज (२० डिसेंबर) काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने इंदापूरमध्ये रक्तदान शिबिर राबविण्यात आले. यामध्ये १०१ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे महिलांनी देखील यावेळी रक्तदान  करून आपला सहभाग नोंदवला.

कोरोनाची महामारी तसेच कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे कडाक्याच्या थंडीत सुरू असलेले आंदोलन पाहता सोनिया गांधींनी यंदा आपला वाढदिवस (६ डिसेंबर) साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा पाहता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘रक्तदान जीवनदान’ या महारक्तदान अभियानांतर्गत राज्यातून २५००० रक्ताच्या पिशव्यांच्या संकलनाचे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केले होते. या अनुषंगाने काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने इंदापूर शहरात रक्तदान शिबीर राबविण्यात आले. यामध्ये १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे यामध्ये महिलांनीही रक्तदान करून सहभाग घेतला. यावेळी रक्तदात्यांना थंडीसाठी उपयुक्त असलेले स्वेटर (जर्किन) भेट म्हणून देण्यात आले.

हे देखील वाचा - तर काँग्रेस इंदापूर नगरपालिकेविरोधात आंदोलन पुकारले

या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, वरिष्ठ उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे, खजिनदार भगवानराव पासगे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल बंडगर, तालुका विध्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष शंभूराज साळुंखे, तालुका काँग्रेसचे सरचिटणीस निवास शेळके, राहुल आचरे, संतोष शेंडे, नितीन राऊत, युवक काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद साबळे, नईम  शेख, अरुण राऊत, यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन पार पडले, अशी माहिती इंदापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष तानाजीराव भोंग यांनी दिली.

हे देखील वाचा - प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या भ्रष्ट कारभाराला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पाठबळ - ऍड. राहुल मखरे यांचा आरोप

या शिबिरासाठी डॉ. श्रद्धा काळे, प्रा. कृष्णा ताटे राज्य कार्यकारिणी सदस्य राष्ट्र सेवा दल, घनश्याम निंबाळकर क्रांतीसुर्य सामाजिक संघटना, शशिकांतजी तरंगे अध्यक्ष यशवंत प्रहार संघटना, गफूरभाई सय्यद संघटक राष्ट्र सेवा दल, रमेशआबा शिंदे संघटक राष्ट्र सेवा दल, तानाजी धोत्रे अध्यक्ष भटक्या विमुक्त जमाती संघटना, धनंजय चांदणे तात्या, शाहिदभाई शेख, या सर्वांनी आवर्जून भेट देऊन सहकार्य केले. या शिबिरासाठी लोकसेवक गणपतराव आवटे फौंडेशन व शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले.

देशावर आलेल्या कोरोना आणि शेतकऱ्यांवर आलेल्या कृषी कायद्यारुपी संकटात श्रीमती सोनिया गांधी यांचा वाढदिवस रक्तदानासारख्या विधायक पद्धतीने साजरा करून काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, काँग्रेस पक्ष सत्तेसाठी नव्हे तर केवळ देशासाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठी राजकारण करतो - तानाजीराव भोंग (शहराध्यक्ष, इंदापूर शहर काँग्रेस कमिटी)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट