इंदापूर शहरातील रेकॉर्डब्रेक रक्तदान होण्याची शक्यता; सुरुवातीच्या दोन तासांतच १०० पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)
शनिवार (२६ डिसेंबर) : राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने इंदापूर शहर युवक काँग्रेसचे सचिव सुफियानखान जमादार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नामदेव मंदिरामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांतच १०० पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन झाले असून, युवकांची रक्तदानासाठी वाढती झुंबड पाहता शिबिर संपेपर्यंत ५०० बाटल्यांचे रक्त संकलन होण्याची शक्यता दिसत आहे. असे झाल्यास हे इंदापूर शहरातील आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक रक्तसंकलन असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि एकूणच नेत्यांकडून युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर इंदापूर शहर युवक काँग्रेसचे सचिव सुफियानखान जमादार यांनी आपल्या २१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर शहरातील नामदेव मंदिरामध्ये आज (२६ डिसेंबर) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
आपण भव्य रक्तदान शिबीर असे नेहमीच ऐकतो. मात्र भव्य रक्तदान शिबीर कशाला म्हणायचे हे यावेळी पाहायला मिळाले. या शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी युवकांची अक्षरशः झुंबड उडाली होती. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांतच १०० पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन झाले होते. शिबिर संपेपर्यंत ५०० पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन अपेक्षित असल्याचे बड्डे बॉय सुफियानखान जमादार यांनी सांगितले. असे झाले तर हे या इंदापूर शहरातील आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक रक्त संकलन असणार आहे.
कोरोनाच्या संकटकाळात इंदापूर शहरातील युवकांनी जात धर्म, पक्ष, संघटना, तुझा माझा असे सर्व मतभेद विसरून देशासाठी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे. युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात रक्तदान करावे - सुफियानखान जमादार (सचिव, इंदापूर शहर युवक काँग्रेस)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा