इंदापूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात नगरपरिषदेकडून वृक्षारोपण


समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

इंदापूर (२८ डिसेंबर) : माझी वसुंधरा अभियानांतर्गत इंदापूर नगरपरिषदेने ६ हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने काल (२७ डिसेंबर) इंदापूर उपजिल्हा रूग्णालय परिसरामध्ये विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये काटेसावर, काटेरीमुकूट, जास्वंद आदी वृक्षांचा समावेश आहे. माझी वसुंधरा अभियान शहरात प्रभावीपणे राबविण्यासाठी इंदापूर नगरपरिष बरीच मेहनत घेत असल्याचे दिसत आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत अंकिता शहा यांच्या हस्ते इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या १६५ मीटरच्या पट्ट्यामध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने काटेसावर, जास्वंद आणि काटेरी मुकुट या वृक्षांचा समावेश होता. या अभियानांतर्गत शहरामध्ये तब्बल ५ हजार झाडे लावण्याचा संकल्प इंदापूर नगरपरिषदेने केला आहे.


यावेळी बोलताना नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी म्हटले की, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवडीमुळे इंदापूर शहराच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे.

हे देखील वाचा - जीवनात यशस्वी होण्यासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे

मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण संरक्षित माझी वसुंधरा या अभियानात इंदापूर नगरपरिषदेने देखील आपला सहभाग नोंदवला असून, पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी या पाच घटकांतर्गत शहरात आपण काम करत आहोत. इंदापूरकरांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवून आपले शहर हरित आणि सुंदर बनवण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा  गारटकर,  इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक अनिकेत वाघ, डॉ. चंदनशिवे, डॉ. शेळके, डॉ.नामदेव गार्डे,  सामाजिक कार्यकर्ते सागर गानबोटे, इंदापूर नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षिरसागर, आस्थापना प्रमुख गजानन पुंडे, आरोग्य निरीक्षक मनोज बारटक्के, सहा. आरोग्य निरीक्षक अशोक चींचकर व लीलाचंद पोळ, पाणीपुरवठा सहा. सुरेश सोनवणे, अलताफ पठाण, आरोग्य विभाग मुकादम दत्तात्रय ढावरे सर्व न. प. कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट