जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या एकूण चार घटनांतील तीन आरोपींना भिगवण पोलीसांच्या बेड्या

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

भिगवण (२३ डिसेंबर) : भिगवण पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गावरील जबरी चोरीच्या दोन आणि दुचाकी वाहन चोरीच्या दोन घटनांमधील तीन आरोपींना गजाआड केले असून, या चोरट्यांकडून चोरी केलेली दोन वाहने आणि एक मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींचा इतरही चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का, भिगवण पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुणे सोलापूर महामार्गावर जबरी चोरीच्या दोन आणि वाहन चोरीच्या दोन घटनांतील तीन जणांना भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) पोलीसांनी अटक केली आहे. यामध्ये नामदेव बबन चुनाडे (वय ४५, रा. अनिल नगर, पंढरपूर, जि. सोलापूर) या आरोपीकडून अंदाजे १५ हजार रु. किंमतीची स्प्लेंडर प्लस (एमएच ४५ क्यू ७३५७), आणि अंदाजे एक लाख रु. किंमतीची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट (एम.एच. ४२/९००९)  अशी दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे.

हे देखील वाचा - वाळू उपसा करणाऱ्या बोटी भिगवण पोलीसांनी उडवल्या

भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३९२,३४ अंतर्गत दाखल वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात विलास निवृत्ती आरडे (वय २२, रा. तिरवंडी, ता. माळशिरस जि.सोलापूर) आणि सचिन व्यंकट सुळ (वय २२, रा. जळभावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांना अटक केली असून, त्यांच्याकडून एका मोबाईलसह गुन्ह्यातील १०० टक्के माल भिगवण पोलीसांनी हस्तगत केला आहे.

हे देखील वाचा - इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या भ्रष्ट कारभाराला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पाठबळ

सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधर, पोलीस नाईक करे, पोलीस नाईक भागवत, पोलीस नाईक देवकाते, पोलीस नाईक खुटाळे  यांनी बजावली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट