वाळू माफियांवर भिगवण पोलीसांची धडक कारवाई; अवैध वाळू उपसा करणाऱ्या २ बोटी केल्या उध्वस्त

प्रतिनिधी : समीर सय्यद

भिगवण (२४ सप्टेंबर) : काल रात्री भिगवण पोलीसांनी वाळू माफियांवर धडक कारवाई करत तक्रारवाडी परिसरातील उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उध्वस्त केल्या. या कारवाईनंतर भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल इन्कलाब रशीद पठाण यांनी फिर्याद दिली असून, दोघा बोट मालकांसह ९ जणांवर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल (२३ सप्टेंबर) रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी भिगवण पोलीसांनी इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी परिसरातील उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर धडक कारवाई केली असून वाळू उपसा करणाऱ्या २ फायबर बोटी जिलेटीनच्या साहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आणि भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या नेतृत्वाखाली भिगवण पोलीसांनी ही कारवाई केली.

वाळू माफियांवर भिगवण पोलीसांनी केलेली धडक कारवाई व्हिडीओच्या माध्यमातून पाहण्यासाठी क्लिक करा

आज (२४ सप्टेंबर) दुपारी भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल इन्कलाब रशिद पठाण यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भा. द. वि. कलम ३३९ , ३७९ , ३४ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम १५ नुसार दोघा बोट मालकांसह ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुतेक आरोपी हे झारखंड राज्यातील आहेत, तर एक जण अहमदनगर जिल्ह्यातील. सोन्या बाळासाहेब सरक (रा. करमाळा जि. सोलापूर) आणि ज्ञानेश्वर शिवाजी सोळंके (रा. मदनवाडी, ता. इंदापूर जि. पुणे) हे दोघे बोटमालक आहेत. पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वीर हे करित आहेत.

हे देखील पहा - अतिवृष्टीमुळे इंदापूरच्या पूर्व भागात पोल्ट्री व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट