उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये पोहताना भिमानगर येथील मुलगा गेला वाहून

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१४ एप्रिल) :- उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये पोहण्यास गेलेला भिमानगर (ता. माढा) येथील रोहन सुरेश पवार हा १५ वर्षीय मुलगा कॅनॉलमध्ये वाहून गेल्याची घटना काल (१३ एप्रिल) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या रोहनला पोहता येत नसल्याने दोरीच्या सहाय्याने पोहत असलेल्या रोहनच्या हातातून दोरी सुटल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी म्हटले आहे.

घटना घडली त्यावेळी उजनीतून कॅनॉलमध्ये तीन हजार क्यूसेस एवढा पाण्याचा विसर्ग सुरू होता. उकाडा वाढल्याने कॅनॉलमध्ये पोहण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. रोहन देखील आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी कॅनॉलवर गेला होता. पोहता येत नसल्याने दोरीला धरून पोहणाऱ्या रोहनच्या हातातून दोरी निसटली. त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. नागरिक व मच्छीमारांनी अनेक तास रोहनचा शोध घेतला. मात्र रोहनचा काहीच पत्ता लागला नाही. या घटनेनंतर उजनी प्रशासनाला कॅनॉलमधील पाण्याचा विसर्ग कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी घटना स्थळाची पाहणी केली.

हे देखील वाचा - उजनी धरण पाहण्यास आलेल्या महिलेचे ३ लाख २० हजारांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावून काढला पळ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट