उजनी धरण बघण्यास आलेल्या महिलेचे तीन लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले; तिघांविरोधात गुन्हा दाखल

संशयाच्या आधारावर इंदापूरमधून अटक; चौकशीअंती सुटका

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१३ एप्रिल) :- सहपरिवार उजनी धरण पाहण्यासाठी आलेल्या मुंबई येथील एका ५२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील तब्बल ३ लाख २० हजार रुपये किमतीचे आठ तोळ्याचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी भर गर्दीतून हिसकावून पोबारा केला. सोमवारी (११ एप्रिल) संध्याकाळी इंदापूर तालुक्यातील डाळज नं. ३ गावच्या हद्दीत घडलेल्या या घटनेसंदर्भात प्रेमा विजय सपकाळ (रा. सुभहर्श अपार्टमेंट, ए ४०४, प्लाट नं. ३२, सेक्टर ११, कामोठे, नवी मुंबई) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात मंगळवारी (१२ एप्रिल) तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. या संदर्भात संशयाच्या आधारावर इंदापूरमधून एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले.

रविवारी (१० एप्रिल) आपल्या लहान मुलाच्या लग्नाच्या सुपारीच्या कार्यक्रमासाठी प्रेमा सपकाळ सहकुटुंब सांगली या ठिकाणी गेल्या होत्या. सोमवारी (११ एप्रिल) परतीच्या प्रवासात सर्वजण उजनी धरण पाहण्यासाठी भिमानगर येथे आले होते. धरण भेटीनंतर रात्री ८ वा. सपकाळ कुटुंब पुणे सोलापूर हायवेवरील डाळज नं. ३ हद्दीतील एच. पी. पेट्रोल पंपावर गाडीमध्ये सिएनजी भरण्यासाठी थांबले होते. पंपावर गर्दी असल्याने लाईनमध्ये गाडी लावून सर्व कुटुंब जवळच्या स्वादिष्ट प्युअर व्हेज हॉटेलच्या समोर उभे होते. यावेळी सिएनजी भरण्यासाठी गाडी लावली असल्याचा खोट्या बहाण्याने दोन अनोळखी इसम हॉटेलच्या समोर थांबले होते. पैकी पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेल्या अंदाजे २५ वर्षीय चोरट्याने प्रेमा सपकाळ यांच्या गळ्यातील ८ तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून आपल्या साथीदारासह पुणे सोलापूर हायवे ओलांडून ऊसाच्या शेतात पोबारा केला.

हे देखील वाचा - राष्ट्रवादी भाजप कार्यकर्त्यांमधील वाद विवाद, चिथावणीखोर वक्तव्ये इंदापूर मधील वातावरण दूषित करताहेत

हॉटेलच्या मॅनेजरने दोघा चोरट्यांचा पाठलाग करत त्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला. मात्र या दोघा चोरट्यांच्या दुचाकीवर असलेल्या तिसऱ्या साथीदाराने मॅनेजरला लाथ मारून जमिनीवर पाडले व दुचाकीसह तिथून पळ काढला. पेट्रोल पंप आणि हॉटेल अशा नागरिकांनी गजबजलेल्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट