इंदापूर शहरात चोरी करणारी महिला गँग पुन्हा सक्रिय; मेन रोडवरील श्री. माळी ज्वेलर्समध्ये केली चोरी
इंदापूर (२५ जानेवारी) :- चेहऱ्याला स्कार्फ बांधून चोरी करणारी महिला गँग इंदापूरात पुन्हा सक्रिय झाली असून, स्कार्फ बांधलेल्या चार अनोळखी महिलांनी इंदापूर शहरातील मेन रोडवरील सिध्देश्वर चौकात असलेल्या श्री. माळी ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानात भर दिवसा चोरी केल्याची घटना रविवारी (२३ जानेवारी) दुपारी पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यासंदर्भात दुकानाचे मालक आप्पा मारुती राऊत (रा. सावतामाळीनगर, इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून चार अज्ञात महिलांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भा. द. वि. ४०६, ४२० कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा - भिशी प्रकरण - आणखी काही चालकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता; सभासदही गोत्यात येणार?
याआधीही स्कार्फ बांधलेल्या चार महिलांचा समावेश असलेल्या एका महिला गँगने तीन महिन्यांपूर्वी इंदापूर शहरातील "व्यंकटेश शू वर्ल्ड" या फुटवेअरच्या दुकानात दिवसा ढवळ्या चोरी केली होती. रविवारी एका लहान बाळासह चांदीचे जोडवे व पैंजण घेण्याच्या बहाण्याने श्री. माळी ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात आलेली ही महिला गँग अनेक पैंजणाचे गठ्ठे व जोडवे बघूनही काहीही पसंत नसल्याचे कारण देत काहीही न घेता तब्बल ४५ हजारांचे १५ जोड (प्रत्येकी वजन ६५० ग्रॅम) पैंजण घेऊन गेली हे विशेष. शंका आल्याने राऊत यांनी सीसीटिव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर आपण दाखवलेल्या चार ते पाच पैंजण गठ्ठ्यातील १५ जोड पैंजण असलेला एक गठ्ठा घेऊन पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. लेकीन, तब तक काफी देर हो चुकी थी। अर्थातच त्या पसार झाल्या होत्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा