बेकायदेशीर पिस्तुल आणि जिवंत काडतूसांसह दोघांना अटक; वालचंदनगर पोलीसांची कारवाई

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

वालचंदनगर (२ नोव्हेंबर) :- बेकायदेशीर पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह वालचंदनगर पोलीसांनी दिनेश धायगुडे (रा. सावतामाळीनगर, अंथुर्णे, ता. इंदापूर) आणि रुकेश खुरसिद भोसले (रा. सायकरवस्ती, राशिन, ता. कर्जत, जि.अहमदनगर) या दोघांना अटक केली आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनेश धायगुडे बेकायदेशीर पिस्तुलसह आल्याची बातमी गोपनिय सुत्रांमार्फत वालचंदनगर पोलीसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांनी तपास केला असता दिनेश धायगुडे याच्याकडे बेकायदेशीर पिस्तुल व २ जिवंत काडतुसे आढळून आली.

या संदर्भात दिनेश धायगुडे याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचे पिस्तुल रुकेश खुरसिद भोसले याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. बेकायदेशीर शस्त्र बाळगणे व विक्री केल्याप्रकरणी संबंधित दोघांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

हे देखील वाचा - ब्रेकिंग - कर्मयोगी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचा उद्रेक; शेतकऱ्यांनी काटा पाडला बंद

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांच्या नेतृत्वाखाली सहा.पो. फौजदार शिवाजी निकम, पोलीस हवालदार रविंद्र पाटमास, पोलीस नाईक विनोद पवार, पोलीस नाईक अमर थोरात यांनी पार पाडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट