श्रीगोंद्यात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीच्या दिवशी संप

संपाला बसलेले श्रीगोंदा आगारचे एसटी कर्मचारी

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

श्रीगोंदा (७ नोव्हेंबर) :- ऐन दिवाळीच्या दिवशी श्रीगोंदा येथील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचं हत्यार उपसलं आहे. पगार वाढ होईपर्यंत, महागाई भत्ता आणि बोनस मिळेपर्यंत व एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होईपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा श्रीगोंदा आगारातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. श्रीगोंदा येथील एसटी डेपोच्या प्रवेश द्वारावर गुरुवारी (४ नोव्हेंबर) सकाळपासून कर्मचारी बेमुदत संपास बसले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार असून, ऐन दिवाळीत हक्कांसाठी भांडावे लागत असल्याने ही दिवाळी आमच्यासाठी काळी दिवाळी असल्याचे सांगितले.

यावेळी एसटी महिला कर्मचारी एच. एन. पिल्ले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि आमची आर्थिक कुचंबणा थांबवावी. अनेक वर्ष आम्ही या मागण्यासाठी सरकारकडे साकडे घालतोय, मात्र आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जात आहे. कोरोना काळात एसटी

कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून अविरत एसटी सुरु ठेवली होती. तुटपुंज्या पगारात प्रपंच भागत नसल्यामुळे आतापर्यंत जवळपास ३३ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अनेक दिवस उलटूनही संपाची दखल न घेतल्याने आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

संपामुळे श्रीगोंदा बस स्थानकावरून एकही बस सोडण्यात आली नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. संपादरम्यान श्रीगोंदा आगारात दौंड व आष्टी डेपोच्या बसेस दाखल होताच बसमधील ड्राइव्हर व कंडक्टर यांचे संपातील महिला कर्मचाऱ्यांनी स्वागत करून पुष्पवृष्टी केली. या संपास दलित महासंघाचे संस्थापक मच्छिंद्र सकटेसह भाजपा, प्रहार अपंग संघटना आणि इतरही संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट