शिवइतिहासाला जोपासण्यासाठी इंदापूरमध्ये शिवसृष्टी होणे गरजेचे - शिवव्याख्याते गणेश धालपे

किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांसह शिवव्याख्याते गणेश धालपे आणि आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे पदाधिकारी

किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१७ नोव्हेंबर) :- छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील आदर्श आणि कल्याणकारी राजे होते. त्यांच्या इतिहासातून आजही शिवप्रेमी जगण्याची, लढण्याची आणि संघर्षाची प्रेरणा घेत असून, शिवरायांचा इतिहास जोपासण्यासाठी ऐतिहासिक अशा इंदापूर शहरात शिवसृष्टी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते गणेश धालपे यांनी केले. आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीत 'किल्ले बनवा' स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानपत्र देण्याकामी काल (१६ नोव्हेंबर) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या स्पर्धेत इंदापूर, बारामती व माढा तालुक्यातील जवळपास २५० पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.

इंदापूर शहर हे ऐतिहासिक शहर असून, वीर मालोजीराजेंची समाधी देखील याच शहरात आहे. त्यामुळे शिवरायांच्या इतिहासाला जोपासण्यासाठी इंदापूर नगरीत शिवसृष्टी होणे गरजेचे असल्याचे मत शिवरायांच्या इतिहासाचा प्रचार प्रसार करणारे शिवव्याख्याते गणेश धालपे यांनी व्यक्त केले. सोबतच त्यांनी आरोग्य संदेश प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या 'किल्ले बनवा' स्पर्धेमुळे शिवरायांच्या इतिहासाला उजाळा मिळत असल्याचेही म्हटले. यावेळी आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा आणि कार्याध्यक्ष प्राचार्य तुषार रंजनकार यांनी उपस्थितांना प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

हे देखील वाचा - विद्यार्थ्यांनी बाह्य गोष्टींकडे आकर्षित न होता ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे - न्यायमूर्ती पी. बी. पाटील यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला

या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य ज्योती जगताप, भास्कर गटकुळ, अरविंद गारटकर, मुख्याध्यापक हनुमंत बोंगाणे, प्राचार्य सुप्रिया आगरखेड, श्रीकृष्ण टेकाळे, भीमराव चंदनशिवे, डॉ. राधिका शहा, अनुराधा इनामदार, शकीला सय्यद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमीर शेख यांनी, सुत्रसंचलन विजयकुमार फलफले यांनी, तर आभार दीपक जगताप यांनी मानले.

पारितोषिक पहिली ते चौथी गट

प्रथम - अंजुम शेख

द्वितीय - विदिता जाधव

तृतीय - पार्थ नरुटे

उत्तेजनार्थ - यशराज व्यवहारे, कार्तिकी सरडे, अदिती जगताप

इयत्ता पाचवी ते सातवी गट

प्रथम - मनीष नायकुडे

द्वितीय - संस्कृती व्यवहारे

तृतीय - अर्णव कानगुडे

उत्तेजनार्थ - शुभम ननवरे, आयान बागवान, सई कदम

पारितोषिक इयत्ता आठवी ते दहावी गट

प्रथम - अथर्व परदेशी

द्वितीय - ऋतिक राऊत

तृतीय - प्रियंका दिवसे

उत्तेजनार्थ - भक्ती जाधव, दर्शन जाधव

विशेष पारितोषिक - निखिल मद्रे





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट