लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेना आणि शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने गरजवंतांना चादरींचे वाटप
| लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त चादर वाटप करताना |
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१५ नोव्हेंबर) :- हजारो क्रांतिवीरांना प्रेरणा ठरणारी ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ ही प्रतिज्ञा घेऊन ब्रिटिश शासनाविरोधात जहाल पध्दतीने लढा देणारे आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीच्या निमित्ताने काल (१४ नोव्हेंबर) लहुजी शक्ती सेना आणि शिवधर्म फाउंडेशन यांच्या वतीने इन्द्रेश्वर चौकातील लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शहरातील अनेक गरजवंतांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने उबदार चादरींचे वाटप करून जयंती विधायक पध्दतीने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक आण्णा काटे, नाना काटे, लहुजी शक्ती सेनेचे इंदापूर तालुका कोअर कमिटीचे अध्यक्ष तानाजी भाऊ सोनवणे, इंदापूर तालुका युवक कार्याध्यक्ष अक्षय भाऊ बागाव, युवा नेते सोमनाथ भाऊ थोरात, मयूर भाऊ ढावरे, गोरख भाऊ ढावरे, सागर जगताप, मंथन पवार, अक्षय जगताप, दादा गवळी, साजन ढावरे, राहुल गवळी, लहु सैनिक समाज बांधव आदी उपस्थित होते.
समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे व केवळ आपल्या कामाच्या जोरावर इंदापूर तालुकाध्यक्ष पदावरून नुकतेच लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेले दत्ताभाऊ जगताप यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देताना, जयंती विधायक कार्याच्या माध्यमातून साजरी करण्याच्या उद्देशाने, तसेच उघड्यावर राहणाऱ्या समाजातील वंचित घटकांना मायेचा आधार मिळावा आणि कडाक्याच्या थंडीपासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी लहुजी शक्ती सेना आणि शिवधर्म फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आम्ही थंडीपासून संरक्षण देणाऱ्या उबदार चादरी वाटप केल्याचे म्हटले.
संभाजी विडी वरून छत्रपती संभाजी महाराजांचे नांव हटवण्यासाठी पुरंदरच्या पायथ्याशी यशस्वी आंदोलन करणारे दीपक आण्णा काटे यांनी देखील सर्व बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देताना, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या आठवणींना उजाळा दिला. लहुजींचे कार्य आजही देशवासियांसाठी प्रेरणा ठरत असून, याच प्रेरणेने आम्हाला त्यांच्या २२७ व्या जयंतीनिमित्त समाजातील गरजवंत नागरिकांना चादरींचे वाटप करण्याची संकल्पना दिल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा