राज्यमंत्र्यांचा विकास कामांचा धडाका सुरूच; शहामध्ये उद्या होणार १२ कोटी १५ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (५ मार्च) - विकास कामांच्या श्रेयवादाला फाटा देत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका सुरूच असून, शहा-महादेवनगर (ता. इंदापूर) येथील तब्बल १२ कोटी १५ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ रविवारी (६ मार्च) इंदापूर तालुक्याचे आमदार व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी ६ वाजता पार पडणार असून, या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र तांबिले, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, माजी सभापती बांधकाम विभाग पंचायत समिती प्रवीण माने, पंचायत समिती सदस्य अभिजीत तांबिले, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे तसेच वडापुरी गणातील कार्यकर्ते पदाधिकारी, इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


या प्रसंगी दत्तात्रय भरणे यांची जाहीर सभा देखील होणार आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीमुळे शहा गावाचा कायापालट झाला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली एकूण १२ कोटी १५ लाख रुपयांचा निधी शहा गावातील विविध विकास कामांसाठी मंजूर झाला असल्याचे या कार्यक्रमाचे आयोजक व इंदापूर पंचायत समितीचे सदस्य सतिश (गोटू) पांढरे यांनी म्हटले आहे. रविवारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या सर्व मंजूर विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजन होणार आहेत. शहा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ हे कार्यक्रमाचे नियोजन करणार असल्याचेही पांढरे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट