इंदापूर तालुक्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून होणार १०० किलोमिटर अंतराचे पाणंद रस्ते - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर तालुक्यातील रस्त्यांचा होत आहे कायापालट

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (९ मार्च) :- अनेक वर्ष मंत्रीपद भोगणारा मात्र विकासापासून वंचित राहिलेल्या इंदापूर तालुक्यात आता विकासाची गंगा वाहू लागली असून, मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून जवळपास १०० किलोमिटर अंतराचे पाणंद रस्ते मंजूर झाले असल्याची माहिती इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या योजनेतून इंदापूर तालुक्यातील विविध गावांमधील जवळपास ७२ ठिकाणच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल तालुक्याच्या ठिकाणी व मुख्य बाजारपेठांमध्ये पोहोचवणे सहज शक्य होणार आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर स्थित इंदापूर तालुक्यात आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय श्रीमंती लाभली असतानाही विकासाच्या बाबतीत मात्र इंदापूर तालुका गरीब राहिला हे दुर्दैव. विशेष म्हणजे अनेक वर्ष मंत्रीपद भोगलेल्या इंदापूर तालुक्यात नागरिकांची मुख्य गरज व दळणवळणासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांची दुरावस्था सर्वश्रुत आहे. स्वातंत्र्यापासून आजतागायत न झालेले अनेक ऐतिहासिक रस्तेही इंदापूर तालुक्यात अस्तित्वात आहेत. मात्र न भूतो न भविष्यति एवढा भरघोस निधी इंदापूर तालुक्यासाठी आणणाऱ्या दत्तात्रय भरणे यांच्या मागील दोन वर्षांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात तालुक्यातील रस्त्यांचे स्वरूप बदलू लागले आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून जवळपास १०० किलोमिटर अंतराचे पाणंद रस्ते मंजूर झाले असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच दिली आहे. या योजनेतून इंदापूर तालुक्यातील विविध गावांमधील जवळपास ७२ ठिकाणच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांसाठी रोजगार हमी योजनेतून मजुरीसाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक किलोमीटर करिता साधारणपणे २५ लाख इतका खर्च गृहीत धरल्यास इंदापूर तालुक्यातील पानंद रस्याकरिता जवळपास २५ कोटी रुपये इतक्या किमतीचे रस्ते होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाहने गेल्यास शेतमाल वेळेवर बाजारपेठेत पोहोचण्यास मदत होणार आहे.

या योजनेंतर्गत या रस्त्यांना मिळाली आहे मंजुरी

अंथूर्णे (३ किमी), अजोती (१.५ किमी), कचरवाडी (२ किमी), कडबनवाडी (४ किमी), काझड (४.५ किमी), कळंब (१ किमी), कळस (१.५ किमी), कालठण नंबर २ (३.५ किमी), कुरवली (२ किमी), गोतंडी (५ किमी), गिरवी (२ किमी), चाकाटी (७ किमी), निमगाव केतकी (४.५ किमी), जाधववाडी (१.५ किमी), जाचकवस्ती (१.५ किमी) झगडेवाडी (५ किमी), लोणी देवकर (१ किमी), वडापुरी (१.५ किमी), वरकुटे खू.(२.५ किमी), शहा (१.५ किमी), शेळगाव (१ किमी), सणसर (१.५ किमी), सपकळवाडी (१.५ किमी), सरडेवाडी (१.५किमी), सराफवाडी (१.५किमी), हागारेवाडी (१ किमी), पिंपरी बु.(१.५ किमी), पिटकेश्वर (अर्धा किमी), पिठेवाडी (२ किमी), पोंधवडी (१.५ किमी), बाभूळगाव (२ किमी), बिजवडी (अर्धा किमी), मदनवाडी (१ किमी), माळवाडी (१.५ किमी), लाकडी (१.५ किमी), लासूर्णे (१.५ किमी), लुमेवाडी (२ किमी), तक्रारवाडी (१.५ किमी), तरटगाव (१.५ किमी), निमसाखर (५.५ किमी), पिंपरी खु.(३ किमी), निरगुडे(१.५ किमी), निरनिमगाव (१.५ किमी), न्हावी (२ किमी), पंधारवाडी (१ किमी) व पळसदेव (१.५ किमी) येथे रस्ते होणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट