राज्यमंत्र्यांच्या विकास कामांची गाडी सुसाट; तरंगवाडी गोखळी येथील ८ कोटी ७५ लाखांच्या विविध विकास कामांचे उद्या होणार उद्घाटन व भूमिपूजन


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१८ मार्च) :- दत्तात्रय भरणे यांच्या विकास कामांची गाडी अजूनही सुसाट असून, या गाडीला ब्रेक लागणार नसल्याचे सध्या दिसत आहे. शुक्रवारी (१८ मार्च) तरंगवाडी गोखळी भागातील जवळपास ८ कोटी ७५ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम भरणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. सायंकाळी ५ वा. होणाऱ्या या कार्यक्रमानंतर ६ वाजता गोखळीमध्ये होणाऱ्या सभेमध्ये राज्यमंत्री भरणे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. शहा (ता. इंदापूर) येथे ६ मार्च रोजी झालेल्या जाहीर सभेत बोलताना भरणे यांनी विरोधकांच्या पेनातील शाई संपेल परंतु विकास कामांची यादी संपणार नाही असे वक्तव्य केले होते. उद्या होणाऱ्या व एकूणच होत असलेल्या व झालेल्या विकास कामांच्या जोरावर भरणेंच्या वरील वक्तव्याला वजन प्राप्त झाले आहे.

नुकतेच राज्यमंत्री भरणे यांनी ६० कोटींच्या जवळपास विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन वडापुरी पंचायत समिती गणासह इंदापूर तालुक्यातील चाकाटी, कुंभारगाव अशा विविध ठिकाणी केले होते. तर मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून जवळपास १०० किलोमिटर अंतराचे पाणंद रस्ते इंदापूर तालुक्यासाठी मंजूर झाले असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून देण्यात आली होती. या योजनेंतर्गत प्रत्येक किलोमिटरला २५ लाख याप्रमाणे जवळपास २५ कोटी रुपये मंजूर झाल्याने याचा फायदा इंदापूर तालुक्यातील जवळपास ७२ ठिकाणच्या रस्त्यांना होणार आहे.


शुक्रवारी सायंकाळी ५ वा. होणाऱ्या विविध विकास कामांच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमात तरंगवाडी गोखळी रस्ता (२ कोटी), तरंगवाडी ओढ्यावरील पुल (७५ लाख), गोखळी प्राथमिक आरोग्य केंद्र (७३ लाख), तसेच तरंगवाडी, गोखळी येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शशिकांत तरंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, तरंगवाडीचे सरपंच कान्होपात्रा जाधव, उपसरपंच कांतीलाल तरंगे, गोखळीच्या सरपंच अलका पोळ, उपसरपंच सचिन तरंगे उपस्थित राहणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट