इंदापूर तालुक्यासाठी अर्थसंकल्पातून १६० कोटींचा निधी मंजूर - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२८ मार्च) :- नुकत्याच पार पडलेल्या (मार्च २०२२) अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये इंदापूर तालुक्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत १६० कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. रविवारी (२७ मार्च) गिरवी काटी परिसरातील जवळपास २० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनानंतर काटी येथे पार पडलेल्या जाहीर सभेत त्यांनी ही माहिती दिली. अवघ्या दोन वर्षांच्या मंत्रिपदाच्या कालखंडात दत्तात्रय भरणे यांनी न भूतो न भविष्यति इतका कोट्यवधींचा निधी इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी खेचून आणला आहे.
दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांमुळे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून महाराष्ट्रात सर्वाधिक निधी इंदापूर तालुक्यासाठी मंजूर झाला आहे. निंबूत (ता. बारामती) येथील सभेत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दत्तात्रय भरणे यांना उद्देशून म्हटले 'तुम्ही राज्याचे मंत्री आहात, केवळ इंदापूर तालुक्याचे नव्हे, त्यामुळे आमच्याकडेही थोडा निधी पाठवा', हे वाक्य सर्वकाही स्पष्ट करत आहे. इंदापूर तालुक्यातील गाव, वाड्या वस्त्यांपर्यंत रस्ते पूर्णत्वास आले आहेत. तर ज्या रस्त्यांबाबत अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबित होती अशा दळणवळण, शेती आणि औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या रस्त्यांची कामे आता या मंजूर झालेल्या १६० कोटींच्या निधीतून केली जाणार आहेत.
१६० कोटींच्या निधीतून होणारी नियोजित कामे
पिठेवाडी बावडा भगतवाडी ते कचरेवाडी ८ किमी (रक्कम ९ कोटी ५० लक्ष), नॅशनल हायवे ९ ते राऊतवाडी, गायकवाड वस्ती, पाटील वस्ती, बेंद वस्ती, माळवाडी ते इंदापूर रस्ता, एकूण लांबी १४ किमी (रक्कम १६ कोटी १५ लाख), गोंदी ते ओझरे, गिरवी ते शिरसागरवस्ती, पाटील वस्ती, ठोकळे वस्ती, रस्ता एकूण लांबी ११ किमी (रक्कम १२ कोटी ३५ लाख), रा. महामार्ग ९६५ ते झगडेवाडी, वडापुरी ते शेटफळ हवेली, नीरा भीमा कारखाना ते लाखेवाडी रस्ता, एकूण लांबी १५ किमी (रक्कम १७ कोटी १० लाख), इंदापूर -शिरसोडी रस्ता ते माळवाडी, ठाकुरवाडी, पेटकर वस्ती, चिंदादेवी, आजोती, टाकळी, पडस्थळ रस्ता, एकूण लांबी १६ किमी, (रक्कम १८ कोटी ५ लाख), मत्स्य बीज केंद्र ते भांगे वस्ती, ननवरे वस्ती ते कांदलगाव, भास्कर पाटील वस्ती ते खामगळ वस्ती, एकूण लांबी १० किमी (रक्कम ११ कोटी ४० लाख), पळसदेव मराडेवाडी ते कळस ते बोरी रस्ता, एकूण लांबी ८ किमी (रक्कम ७ कोटी ६० लाख), भवानीनगर कारखाना मागील बाजू ते सपकळवाडी, उदमाईवाडी, मानकरवाडी, मोरे वस्ती, उद्धट ते पवारवाडी रस्ता, एकूण लांबी १० किमी (रक्कम ११ कोटी ४० लाख), अंथुर्णे ते शिरसटवाडी, निमसाखर रस्ता, एकूण लांबी १० किमी (रक्कम १२ कोटी ३५ लाख), बंबाडवाडी, चव्हाणवाडी, परीटवाडी, सावंतवाडी ते फडतरे नॉलेज सिटी कळंब ते रत्नपुरी रणगाव रस्ता, एकूण लांबी १२.५०० किमी (रक्कम ८ कोटी ५५ लाख), अंथुर्णे ते भरणेवाडी रस्ता काँक्रीटकरण करणे, एकूण लांबी १.५ किमी (रक्कम ३ कोटी ८० लाख), सणसर ३९ फाटा ते काझड, अकोले, सिनारमास रस्ता, एकूण लांबी १३ किमी (रक्कम १५ कोटी), इंदापूर तालुक्यातील बी.के.बि.एन रस्त्यावरील जांब निमसाखर निरवांगी गावाच्या हद्दीतील लांबीत गटार बांधकाम करणे व गटरापर्यंत रुंदीकरण करणे (रक्कम ६ कोटी), सार्वजनिक बांधकाम उपविभाग इंदापूर अधिकारी कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम (रक्कम २ कोटी ६७ लाख), इंदापूर येथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी चार व्हिआयपी कक्ष बांधकाम (३ कोटी ५५ लाख), भिगवण येथे विश्रामगृह विस्तारित इमारत बांधकाम (३ कोटी १० लाख), सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिगवण इमारत बांधकाम (१ कोटी ५८ लाख) यांचा समावेश आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा