आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास कसा मिळवता येईल?
शुक्रवार (२३ एप्रिल) : 'ब्रेक दि चेन’ या मोहिमेंतर्गत २२ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून प्रवासावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता नागरिकांना खालील लिंकवर अर्ज करता येणार आहे. https://t.co/c2fxPS3Qzv अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास घेता येणार आहे. मात्र या पासचा वापर केवळ आपात्कालीन परिस्थिती केला जावा असे आवाहन महाराष्ट्र पोलीस विभागाने आपल्या ऑफिसियल ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करून केले आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनामुळे उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून काही आपात्कालीन पावले उचलण्यात आली आहेत. साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील कलम २ आणि अनुषंगिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीन्वये संपूर्ण राज्यभर उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा - काय आहेत प्रवासावरील निर्बंध? वाचा सविस्तर
विनाकारण आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध १ मे सकाळी ७ पर्यंत लागू असणार आहेत. परंतु आपत्कालीन परिस्थितीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात आली असल्याने नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा