मणिपूर हिंसाचाराचा निषेध आणि बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या इंदापूरकर येणार एकत्र
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२५ जुलै) :- मणिपूर राज्य मागील अनेक महिन्यांपासून हिंसाचारात होरपळत आहे. यामध्ये अनेक निष्पापांचा बळी गेला असून, हजारो महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. यामध्ये कारगिल युद्धात देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकाच्या पत्नीचाही समावेश आहे. या सर्व घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आणि हिंसाचारात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी बुधवारी (२६ जुलै) सकाळी ११ वाजता समस्त इंदापूरकर एकत्र येणार आहेत.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष आणि संघटनेत कार्यरत पदाधिकाऱ्यांच्या वतीने मंगळवारी (२५ जुलै) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवाजीराव मखरे, हनुमंत कांबळे, महादेव चव्हाण आणि हमीद आत्तार आदी उपस्थित होते. याबाबत एक पत्रक देखील सोशल मीडियावर वायरल करण्यात आले असून, बुधवारी (२६ जुलै) वर नमूद वेळी नगरपरिषेसमोरील स्वातंत्र्य सैनिक स्तंभाजवळ एकत्र येण्याचे आवाहन या पत्रकाद्वारे इंदापूरकरांना करण्यात आले आहे.
नेमकं या पत्रकात काय म्हटलंय? सारांश...
मागील अडीच महिन्यापासून मणिपूर जातीय दंगलीत होरपळत आहे. जवळपास १५० नागरिकांचा बळी गेला असून, संपूर्ण जगात देशाला मान खाली घालायला लावतील अशा अनेक घटना तेथे घडल्या आहेत. मात्र सत्तेत मग्रूर असणारे केंद्र व राज्य सरकार या घटनांना आटोक्यात आणू शकले नाही, नागरिकांना संरक्षण देऊ शकले नाही. महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढली जाते, त्यांची हत्या केली हे अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. वंश, वर्ण, लिंग, जात, धर्म, याच्या आधारे भेदाभेद न करता सरकारने प्रत्येकाला संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. मात्र या घटना पाहता याला कुणीतरी आश्रय देत असल्याची शंका उपस्थित होत आहे. या घटना दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे भारतातील प्रत्येक नागरिक चिंतातुर झालेला असून, या घटनेचा धिक्कार झालाच पाहिजे.

भाजप सरकारचा करावा तेवढा निषेध कमी आहे. हे सगळं सरकार च करत आहे असे वाटत आहे. यामागे नक्की मोठ्ठं षडयंत्र असणार. देश झोपलाअसताना इंदापूरचे नागरिक अजून जिवंत आहेत अस म्हणाव लागेल
उत्तर द्याहटवा