इंदापूर पोलीस, स्ट्राईकिंग फोर्स आणि एनजीओ कमांडोंचा इंदापूर शहरातून रुठमार्च; तर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड होत असल्याचा माजी नगरसेवकाचा आरोप
![]() |
| इंदापूर पोलीस, स्ट्राईकिंग फोर्स व एनजीओचे कमांडो |
कंत्राटी कामगारांची मुदतवाढ थांबवल्याने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांची हेळसांड
इंदापूर तालुक्यात वाढता कोरोना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत होणारी संभाव्य गर्दी नियंत्रणात ठेवण्याच्या आणि गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इंदापूर पोलीसांनी पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहरातील पुणे सोलापूर हायवे-आयकॉलेज-खडकपुरा-नेहरू चौक आणि दर्गाह मस्जिद चौक अशा वेगवेगळ्या भागातून रुठमार्च (पथसंचलन) केले. या पथसंचलनात इंदापूर पोलीस ठाण्याच्या चाळीस पोलीसांसह, एनजीओच्या २० कमांडो आणि स्ट्राईकिंग फोर्सच्या एका अधिकाऱ्यासह बारा जवानांनी देखील भाग घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही शिथिलता दिली नसल्याने आणि इंदापूर तालुक्यात अजूनही कोरोनाचा धोका कायम असल्याने पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी आणि शहरातील नागरिकांच्या वारंवार बैठका घेऊन गर्दी टाळण्याच्या सूचना केल्या होत्या. कोरोना संसर्ग टळावा आणि गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा रुठमार्च करण्यात आला. शुक्रवारी देखील इंदापूर पोलीसांनी रुठमार्च काढला होता
कोरोना वाढू नये यासाठी पोलीस प्रशासन घेत असलेली खबरदारी कौतुकास्पद आहे. मात्र, कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याचे कारण देत, केंद्र सरकारने अतिरिक्त मनुष्यबळासाठी देत असलेला निधी थांबवल्याने राज्यशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा ३१ ऑगस्ट रोजी थांबवली आहे. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या स्वरूपात होत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार होणार नाहीत असे गृहीत धरून स्वतःची काळजी घेत कोरोना संसर्गापासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घेणे महत्वाचे आहे. तसेच लवकरात लवकर लसीकरण करून घेणेही गरजेचे आहे. वस्तुतः नियमित डॉक्टरांनी उपलब्ध मनुष्य बळावर कोरोना रुग्णांना उपचार देणे गरजेचे आहे.
(प्रशांत शिताप, माजी नगरसेवक)

पोलिसांचा रूठमार्च स्वागतार्ह आणि मा. नगरसेवक यांची सूचना की "ऊपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे नियमित डॉक्टरांनी कोरोना रूग्णांवर उपचार करायला पाहिजेत" डॉक्टरांनी आपल्या सेवेशी एकनिष्ठ राहाण्यास प्रेरणादायक आहे।
उत्तर द्याहटवा