इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शाळांना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणार - महेश चावले


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२८ मे) :- भविष्यामध्ये इंदापूर तालुक्यात क्रीडा संस्कृती वाढावी आणि दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी तालुक्यातील प्राथमिक शाळांना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे मनोगत इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी जि. प. प्रा. शाळा क्र - ४ येथे क्रीडा साहित्य वाटप करतेवेळी व्यक्त केले. काल (२७ मे) या शाळेस क्रीडा विभागाकडून तब्बल तीन लाखांचे क्रीडा साहित्य देण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव पालवे, सचिन वाघमारे आणि दिनेश काळे हे सहकारी शिक्षक उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिक्षकांकडून क्रीडा अधिकारी महेश चावले यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

इंदापूर शहरात तारेची शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जि. प. प्रा. शाळा क्र. ४ ला तीन लाखांचे दर्जेदार क्रीडा साहित्य इंदापूर तालुका क्रीडा विभागाकडून काल देण्यात आले. १८६५ साली स्थापना झालेली ही तालुक्यातील सर्वात जुनी प्राथमिक शाळा आहे. विशेष म्हणजे जेष्ठ कवयित्री शांता शेळके तसेच लेखक व विधान परिषदेचे सभापती राहिलेल्या ग. प्र. प्रधान यांची प्राथमिक जडणघडण याच तारेच्या शाळेत झाली आहे. जावडेकर गुरुजी सारखे थोर शिक्षक या शाळेला लाभले आहेत. याप्रसंगी क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी, भविष्यात तालुक्यातील क्रीडा संस्कृती वाढीस लागण्याकरिता प्राथमिक शाळांना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये साधारण आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. अशा विद्यार्थ्यांच्या अंगी खेळांशी संबंधित उत्तम गुण असूनही केवळ दर्जेदार साहित्याअभावी या गुणांना वाव मिळत नाही. मात्र आता महेश चावले यांच्या प्रयत्नांमुळे प्राथमिक शाळांना देखील दर्जेदार क्रीडा साहित्य मिळू लागल्याने तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती वाढणार असून, भविष्यात इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शाळांमधून दर्जेदार खेळाडू तयार होतील अशी आशा शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव पालवे यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट