एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार; तीन ते चार अज्ञातांनी केला गोळीबार

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

आपल्या बिनधास्त व निर्भिड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध व एक विद्वान खासदार, उत्तम नेता आणि अनेकवेळा उत्तम संसदपटू म्हणून गौरविण्यात आलेले एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर राष्ट्रीय महामार्ग ९ वरील छिजारसी (पिलखुआ) टोल गेटवर गोळीबार झाल्याची घटना घडली असून, त्यांनी काही वेळापूर्वी स्वतः याबाबत ट्विट करत या हल्ल्याची माहिती दिली आहे. तीन ते चार अज्ञातांनी आपल्या गाडीवर चार राऊंड फायर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या बेछूट गोळीबारात त्यांना कोणतीही इजा झाली नसून, या हल्ल्यात त्यांची गाडी पंक्चर झाली असल्याचे व तदनंतर ते दुसऱ्या गाडीत बसून घटनास्थळावरून निघून गेल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट