बारामती निर्भया पथकाकडून म्हसोबाचीवाडी येथे महिलांना सूरक्षे संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१० फेब्रुवारी) :- महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सध्या शासन आणि प्रशासनाकडून महिला सक्षमिकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण विभागाकडून मंगळवारी (८ फेब्रुवारी) भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये बारामती निर्भया पथकाकडून महीला सक्षमिकरणासंबंधी केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना महिलांच्या सुरक्षेसंबंधी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी निर्भया पोलीस पथकाच्या प्रतिनिधी हवालदार अमृता भोईटे व पंचायत समितीचे समन्वयक डी. जे. राऊत यांनी उमेद अभियानाची माहिती महिलांना दिली. हवालदार अमृता भोईटे यांनी, निर्भया पथक, पोक्सो कायदा, तक्रार कशी व कोठे द्यायची, न घाबरता व्यक्त व्हावे, अन्याय सहन न करता प्रतिकार करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सोबतच त्यांनी सुरक्षे संदर्भात ११२, १०९१, १०० नंबर डायल करून पोलिसांशी संपर्क करून मदत घ्यावी असे आवाहन महिलांना केले. या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थितीची गरज लक्षात घेता बचत गटाकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'जीवन उन्नती' या नवीन अभियानाची सुरुवात देखील करण्यात आली.


या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी, ग्रामसंघ बचत गट समन्वयक अध्यक्षा अनिता राऊत, बँक सखी अनिता ताटे, स्थानिक प्रमुख समन्वयक अध्यक्षा पल्लवी जीवन चांदगुडे, मोनिका चंद्रकांत काळे, कमल चंद्रकांत नवले, रवीना जयकुमार चांदगुडे, शीला रामदास चव्हाण, राजश्री अमोल चांदगुडे, सुरेखा गोरख चांदगुडे, वंदना नानासो चांदगुडे, आशा योगेश चांदगुडे, प्रियंका जालिंदर भोसले, सोनाली सुशांत साळुंखे, नीलंबरी यशवंत नांदगुडे, गीतांजली राहुल चांदगुडे, यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट