इंदापूर पंचायत समितीमधील महिला कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; यशवंत घरकुल योजनेच्या मंजुरीचा चेक सुपूर्द करण्याच्या मोबदल्यात केली होती ५०० रुपयांची मागणी
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१९ फेब्रुवारी) :- शासनाचा भरमसाठ पगार असूनही अवघ्या ५०० रुपयांच्या मोहापाई इंदापूर पंचायत समितीमधील समाज कल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक पदावर काम करणारी महिला कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे. अश्विनी गणेश भोंग (वय ३६ वर्ष, रा. सरस्वतीनगर, क्रिडा संकुल रोड, इंदापूर) या महिला कर्मचाऱ्याला शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन रंगेहात पकडले असून, शासनाकडून मंजूर झालेल्या यशवंत घरकुल योजनेचा २० हजारांचा चेक सुपूर्द करण्याच्या मोबदल्यात या महिला कर्मचाऱ्याने हनुमंत किसन माने (वय ३३ वर्ष, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांना ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
यासंदर्भात हनुमंत किसन माने यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे) यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) सापळा रचुन अश्विनी गणेश भोंग यांना दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान ५०० रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी हनुमंत माने यांच्या फिर्यादीवरून अश्विनी भोंग यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शितल घोगरे, पोलीस शिपाई सौरभ महाशब्दे, भूषण ठाकूर, पोलीस शिपाई प्रशांत वाळके यांनी केली.
शासकीय कर्मचाऱ्यांना लागलेल्या हराम पैशांच्या मोहामुळे शासकीय कार्यालये सामान्य नागरिकांच्या लुटीचे केंद्र बनली आहेत. लाच आणि भ्रष्टाचाराच्या चिखलात एखादा कर्मचारी लोळला नसेल तर त्याला देव माणूस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु, सापडला तो चोर नाही तर बादशाहपेक्षा थोर. त्यामुळेच चोर ठरण्याआधीच अशा थोर माणसांवरदेखील कायद्याचा वचक बसणे आवश्यक आहे.
खरंतर अशी लाचखोर मंडळी गोरगरीब जनतेचं गोचीडासारख रक्त पिऊन पिऊन स्वतः ची उपजीविका करतात.
उत्तर द्याहटवावेळीच अशा लाचखोर नराधमांना देशविरोधी, देशद्रोही, गद्दार घोषित करून भारतीय नागरिकत्व रद्द केले पाहिजे.