साहेब ! शेती परवडंना, गांजा लावायची परवानगी द्या; शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांना नम्र विनंती
![]() |
| गांजा लागवड कायद्याने अपराध |
शासन शेतमालाला हमीभाव देत नसल्याने कवडीमोल विकाव्या लागत असलेल्या शेतीमालामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शिरापूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील अनिल आबाजी पाटील या शेतकऱ्याने अक्षरशः दोन एकर कायद्याने बंदी असलेल्या गांजाची लागवड करण्याची सशर्त परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. ही मागणी शेतकऱ्यांमधील नैराश्याची भावना दर्शवत आहे. पाटील यांची शिरापूर येथे (गट नं. १८१/४) जमीन असून, कोणतंही पीक घेतले तरी शेतीमालाला शासन हमीभाव देत नसल्याने शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण देत त्यांनी ही मागणी बुधवारी (२५ ऑगस्ट) जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
हे देखील वाचा - वाळू तस्करी पोलीसांच्या जीवावर; ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
मशागतीसाठी केलेला खर्चही निघत नाही, उसाच्या बिलालाही वर्ष वर्ष वाट बघावी लागत असल्याने गांजा लावण्याखेरीज आता दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबर पर्यंत दोन एकर गांजा लागवड करण्यास परवानगी न दिल्यास १६ सप्टेंबर रोजी प्रशासनाने परवानगी दिली असे गृहीत धरून गांजा लागवड करणार असून, माझ्यावर गुन्हा दाखल केल्यास प्रशासन जबाबदार असेल असे म्हटले आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा