रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जखमीसाठी डॉक्टरांचा नाही तर पोलीसांचा जीव तळमळताना मी पाहिला
![]() |
| इंदापूर पोलीस ठाणे |
२७ ऑगस्ट २०२१, शुक्रवार, वेळ सायंकाळ ७ ते ७:१५ च्या दरम्यान, ठिकाण लोणी देवकर. पुलावर तिघेजण गाडीच्या प्रतीक्षेत उभे. अचानक एका ब्रेकफेल झालेल्या ट्रकने होत्याचे नव्हते केले. उभ्या असलेल्या तिघांपैकी दोन जण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींचा पाय मांडीमधून तुटून मांडीचे हाड बाहेर निघालेले. रक्तबंबाळ अवस्थेत रात्री ८ च्या आसपास सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पैकी एक तरुण माझा गाळेधारक असल्याने मी त्या ठिकाणी गेलो. मृताची ओळख पटवण्यासाठी पोलीसांनी मला बघण्यास सांगितले. मी दोन बॉडी पाहिल्या त्यामध्ये एक माझा गाळेधारक विजय बबन शिंदे तरुण व्यावसायिक याला मी ओळखले. पण दोघांची ओळख पटवण्यात सर्वच जण अपयशी ठरले.
वेळ निघून जात होती. रात्री ८ च्या दरम्यान आलेल्या जखमीवर प्रथमोपचार झाले. फक्त ड्रेसिंग बरं का. दुसरे काहीही नाही. पुढच्या इलाजासाठी त्याला रात्री १२ - १ वाजेपर्यंत वाट पाहायला लागली असावी. इलाज पण नाही ऍम्ब्युलन पण नाही. रुग्ण तडपडत होता. पोलीस प्रशासनामध्ये तीन कर्तबगार पोलीस अधिकारी श्री. महेश माने साहेब, श्री. आटोळे साहेब, श्री. विक्रमसिंह जाधव साहेब यांनी सरकारी दवाखान्यामधील कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले व स्वतः त्या
जखमीच्या नातेवाइकांची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले. खर्च करण्याची जबाबदारी घेतो म्हणून सांगितले सर्व सरकारी दवाखान्याचे प्रशासन खडबडून जागे झाले. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की ambulance येण्यासाठी रात्री ११:३० ची वेळ लागेल. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जखमीसाठी डॉक्टरांचा नाही तर पोलीसांचा जीव तळमळताना मी पाहिला. अचंबित करणारी सरकारी डॉक्टर, कर्मचाऱ्यांची मानसिकता मी पाहिली.
इंदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, हवालदार नानासाहेब आटोळे साहेब आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रमसिंह जाधव साहेबांनी पत्रकार समीर सय्यद, पत्रकार सुरेश मिसाळ आणि पत्रकार शिवाजी पवार यांच्या मदतीने तातडीने खिलारे मामाच्या खाजगी ambulance मधून जखमी किशोर सपकळ या व्यक्तीला पुण्याच्या ससून दवाखान्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. नेेहमीप्रमाणे २४ तास On duty असलेला खिल्लारे मामा अवघ्या ५ मिनिटांत रुग्णालयात आला. दुसऱ्या मिनिटाला जखमीला घेऊन गेलापण. इंदापूर पोलीसांनी तात्काळ निर्णय घेतला नसता तर जखमी इंदापूर रुग्णालयातच मेला असता व त्याची बॉडी postmortam करूनच त्याच्या नातेवाईकांच्या हवाली करावी लागली असती. अशा emergency situation मध्ये रुग्णालयातील staff ने पोलीसांना, नागरिकांना सहकार्य केलं पाहिजे. रुग्णालयाकडे anbulance पाहिजे. असेल तर दिली पाहिजे. असो, salute आहे वर्दीतल्या त्या तिन्ही देव माणसांना... माणुसकी अजून जिवंत आहे.
(सादिक शेख, इंदापूर)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा