नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन

 

तालुक्यातील हजारो बेरोजगार युवक आणि युवतींना होणार फायदा

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१७ जून) :- इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने युवक आणि युवतींच्या उज्वल भविष्यासाठी शनिवारी (१८ जून) इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या इंदापूर तालुक्यातील हजारो युवक आणि युवतींना फायदा होणार आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष, तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष गोकुळदास शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा नोकरी महोत्सव पार पडणार आहे.

वाढत्या बरोजगारीमुळे युवकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. चांगले शिक्षण आणि गुणवत्ता असूनही अनेक युवक योग्य मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारी आणि नैराश्याच्या विळख्यात अडकले आहेत. अशा युवकांसाठी हे नोकरी महोत्सव फायद्याचा ठरणार आहे. शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणाऱ्या या नोकरी महोत्सवात मॅन्युफॅक्चरिंग, बँकींग, फार्मा, फायनान्स रिटेल, आयटी, बी.पी.ओ., के.पी.ओ., हाॅस्पॅलिटी आदी क्षेत्रात आठवी ते दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या युवक आणि युवतींना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

इच्छुक युवक आणि युवतींनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केले आहे. तत्पूर्वी उमेदवारांना ९९२१७७७८८९ अथवा ९६६५१८६५४५ या नंबरवर नोंदणी करावी लागणार आहे. 

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व एकंदरित माहिती ५ प्रतींमध्ये असावी

बायोडाटा

शैक्षणिक कागदपत्रे

पासपोर्ट आकाराचा फोटो

आधार कार्ड/मतदान कार्ड इ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट