मुहम्मद पैगंबर यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या इंदापूर बंदची हाक

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१० जून) :- भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी शांततेचे प्रतीक असलेल्या मुहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापूर शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून शनिवारी (११ जून) इंदापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. आज (१० जून) सकाळी ११ वाजता दर्गाह मस्जिद चौकात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. तदनंतर मुस्लिम बांधवांनकडून दर्गाह मस्जिद चौक ते इंदापूर प्रशासकीय भवन असा निषेध मोर्चा देखील काढण्यात आला. यावेळी संबंधित विषयावर इंदापूरचे तहसीलदार आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना निवेदन देण्यात आले.

नुपूर शर्मा ह्या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. टाइम्स नाऊ चॅनलवरील टीव्ही डिबेटमध्ये त्यांनी मानवजातीचे उद्धारकर्ते व शांततेचे प्रतीक मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. नविन जिंदाल यांनीही त्याचीच री ओढली होती. यावरून संपूर्ण जगभरातून, विशेषतः आखाती देशांतून या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अनेक देशांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार देखील घातला आहे. राष्ट्रीय स्तरावरून वाढत्या दबावानंतर भाजपने दोघांनाही पक्षातून निलंबित केले आहे. सोबतच त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

नुपूर शर्मा यांचे वक्तव्य देशातील सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडवणारे

मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी आक्षेपार्ह आणि खोट्या आशयाचे विधान करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना भडकावून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी असे मुस्लिम बांधवांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधवांनी शनिवारी (११ जून) इंदापूर शहर बंदची हाक दिली आहे.

मुस्लिम बांधवांच्या दुखावलेल्या भावना लक्षात घेता इंदापूर शहरातील सर्व नागरिक, व्यापारी बंदला १००% प्रतिसाद देतील

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मालोजी राजेंच्या इंदापूर शहरातील मागील तीस वर्षांचा इतिहास पाहता मुस्लिम समाजाकडून पहिल्यांदाच इंदापूर बंदची हाक देण्यात आली आहे. इंदापूर शहरातील हिंदू मुस्लिमांमध्ये सामाजिक एकोपा घनिष्ट असून, पैगंबरांवर करण्यात आलेल्या बदनामीकारक वक्तव्यानंतर मुस्लिम बांधवांच्या दुखावलेल्या भावना लक्षात घेता इंदापूर शहरातील सर्व नागरिक, व्यापारी उद्याच्या बंदला १००% प्रतिसाद देतील अशी आशा मुस्लिम समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आज निमगाव केतकीतही होता कडकडीत बंद; निवेदन कर्त्यांनाच घावा लागला पोलिसांचा शोध

आज (१० जून) इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथेही मुस्लिम बांधवांकडून शर्मा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्ह बंद पुकारण्यात आला होता. या बंदला नागरिक व व्यापाऱ्यांनी १००% प्रतिसाद दिला. सकाळी मुस्लिम बांधवांकडून हाताला काळ्या फिती बांधून पोलीस मदत केंद्रापर्यंत मुक मोर्चाही काढण्यात आला होता. यावेळी नुपूर शर्मा यांचा फोटो जाळण्यात आला. दरम्यान निवेदन देतेवेळी हजारो नागरिक पोलीस चौकीत जमले होते. मात्र चौकीत एकही पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने निवेदन कर्त्यांनाच पोलिसांची शोधाशोध घ्यावी लागली. बऱ्याच वेळाने आलेल्या कर्मचाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.



टिप्पण्या

  1. . संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते यांचा नेहमीच अशा जगप्रसिद्ध महामानवा बद्दल द्वेष प्रसारित करत असतात मी या घटनेचा निषेध करीत असून त्या दोन्ही संधी वर कायदेशीर कारवाई करा श्री बिभीषण लोखंडे अध्यक्ष आम आदमी पार्टी इंदापूर तालुका

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट