शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक काटे यांच्या कार्याचा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून गुणगौरव
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१० जून) :- संभाजी बिडी वरील संभाजी महाराजांचे नाव हटविण्यात यावे याकरीता यशस्वी आंदोलन करत साबळे वाघिरे कंपनीला गुडघ्यावर आणणाऱ्या, तसेच महापुरुषांच्या नावांचा समावेश नावे व प्रतीके कायदा १९५० अंतर्गत करून महापुरुषांचा होणारा अपमान थांबवा या मागणीसाठी इंदापूर ते मुंबई येथील विधानभवनापर्यंत आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह पायी यात्रा करणारे शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाकडून बुधवारी (८ जून) पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. सदर पुरस्कारासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा युवक अध्यक्ष मयूर आबा सोळसकर यांनी काटे यांची निवड केली.
बुधवारी (८ जून) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दौंड तालुका आणि पुरंदर तालुक्याच्या नवनियुक्त कार्यकारणीसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचा व संस्थांचा गुणगौरव सोहळा केडगाव चौफुला येथील श्री क्षेत्र बोरमलनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अखिल मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत आप्पा पवार, राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात, ह.भ.प. नागवडे महाराज, निवृत्त उपजिल्हाधिकारी रघुनाथ ताडगे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर, शेतकरी जिल्हाध्यक्ष विषाल कुंजीर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर सोळस्कर यांनी केले तर आभार सुरज चोरगे यांनी मानले.
या कार्याची दखल घेत दीपक काटे यांना पुरस्कार प्रदान
संभाजी बिडी' या नावामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होत असल्याचा आक्षेप घेत शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवप्रेमींनी सप्टेंबर २०२० मध्ये पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषण केलं होतं. त्यांच्या या लढ्यानंतर साबळे-वाघिरे कंपनीने गुडघे टेकत या बिडीच्या नावातून संभाजी महाराजांचे नाव वगळून बिडीचे नामकरण 'साबळे बिडी' असे केले होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा