समाज विघातक प्रवृत्तीच्या नुपूर शर्मा आणि नविन जिंदाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी; इंदापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
इंदापूर (१३ जून) :- भाजपाच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी मुहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा इंदापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला असून, काँग्रेस कमिटीने या दोघांवरही तातडीने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या संबंधी काँग्रेस कमिटीकडून सोमवारी (१३ जून) इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीचे इंदापूर तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, शहराध्यक्ष चमन बागवान, पुणे जिल्हा सरचिटणीस जकीर काझी, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर ,श्रीनिवास शेळके, महादेव लोंढे सचिव व सदस्य संजय गांधी निराधार योजना, अनूसुचित तालुकाध्यक्ष युवराज गायकवाड, अल्पसंख्याक आघाडीचे नसिर शेख, श्रीनिवास पाटील, तानाजी राऊत आणि ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष आकाश पवार उपस्थित होते.
विश्वाला शांती, समता आणि बंधुतेचा संदेश देणारे मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल २७ मे रोजी टाईम नाऊ या वृत्त वाहिनीवर भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर नविन जिंदाल यांनी त्यांचीच री ओढत त्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. त्यामुळे जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. इंदापूर काँग्रेस कमिटीने देखील या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जगभरातील मुस्लिमांचे श्रध्दास्थान असलेल्या मुहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून समस्त मुस्लिमांच्या भावना दुखावणाऱ्या नुपूर शर्मा आणि नविन जिंदाल यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोमवारी निवेदनाच्या माध्यमातून इंदापूर काँग्रेस कमिटीने केली आहे.
इंदापूरकर समाज विघातक प्रवृत्तींविरोधात असल्याचे स्पष्ट


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा