इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालये आणि अंगणवाडी इमारतींकरीता ४ कोटी ९१ लाख निधी मंजूर; सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (११ जून) :- इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालये आणि अंगणवाडी इमारतींकरीता तब्बल ४ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये अजोती, लुमेवाडी, सुरवड, कालठण नं.१, भोडणी, व्याहाळी, तरटगाव व खोरोची या गावांचा समावेश असून, या ग्रामपंचायत कार्यालयाकरीता प्रत्येकी १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामांना जिल्हा परिषद स्वनिधी सन २०२२ – २३ अंतर्गत स्व. आर.आर.(आबा) पाटील ग्रामसचिवालय बांधणे या योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे.

सोबतच जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत सन २०२२ – २३ अंतर्गत नवीन अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी ३३ अंगणवाडींकरीता ३ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये चाकाटी, वडापूरी, पवारवस्ती, भाटनिमगाव गावठाण, वरकुटे बु., चितळकरवाडी, रेडणी, कदमवस्ती, कालठण नं.२, गलांडवाडी नं.१, जाधववस्ती, सराटी, गोंदी, ओझरे, हगारेवाडी हनुमानवाडी, भोडणी, भोंगळेवस्ती, बावडा नं.२, कडबनवाडी, काटी शेळके राऊत वस्ती, गंगावळण, लाखेवाडी, थोरवेवस्ती, शेटफळहवेली, हनुमानवाडी, बेलवाडी, लासुर्णे २, लासुर्णे निंबाळकर मळा, लासुर्णे ४, लासुर्णे वैदवाडी मिनी, जांब, म्हसोबाचीवाडी, शेटफळगढे, लामजेवाडी, सणसर १, तावशी हरीजन वस्ती, भिगवण स्टेशन अलीकडे, भिगवण स्टेशन पलीकडे, निमसाखर जाधवमळा , लाकडी , निंबोडी अशा एकूण ३३ अंगणवाडी इमारतींकरीता प्रत्येकी ११.२५ लाख बांधकाम निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट