महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाच्या राज्य संघटक पदी सदाशिव रणदिवे, तर मिलिंद देटगे यांची जिल्हा महासचिव पदी निवड
![]() |
फोटो - डावीकडून सदाशिव रणदिवे, मिलिंद देटगे आणि रतिलाल कुचेकर
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (८ जुलै) :- महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवड नुकतीच पार पडली. गुरुवारी (७ जुलै) पार पडलेल्या या निवड प्रकियेत राज्य संघटक पदी सदाशिव रणदिवे यांची, तर पुणे जिल्हा महासचिव पदी मिलिंद देटगे यांची वर्णी लागली आहे. तर जिल्हा संघटकपदी रतिलाल कुचेकर यांची आणि जिल्हा उपाध्यक्षपदी बालाजी मादळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे व पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना दिली आहे.
या निवड प्रक्रियेवेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे, राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे, पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, पुणे मनपा अध्यक्ष कैलास थोरात, पुणे मनपा महासचिव बापू विद्यागज इ. पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा