शासनाने डॉ. इनामदार यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करावा - डॉ. श्रेणिक शहा
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (५ जुलै) :- अकलूज येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, तसेच अकलूज आयएमएचे संस्थापक डॉ. एम. के. इनामदार यांचे लक्षवेधी कार्य पाहता शासनाने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करावा असे प्रतिपादन समाजभूषण शरद कुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांनी केले. 'डॉक्टर डे'चे औचित्य साधून रविवारी (३ जुलै) इंदापूर येथे इंदापूर इंडीयन मेडीकल असोसिएशन, होमिओपॅथिक व आयुर्वेदिक असोसिएशन, पुणे योद्धा ग्रुप, समाजभूषण शरद कुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने "जल है तो कल है", "आपल्या आरोग्याचे शिल्पकार आपणच" या विषयांवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. इनामदार यांचा इंडीयन मानपत्र देऊन, तर इंदापूर मधील डॉक्टरांना देवदूत सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. एम. के. इनामदार हे रुग्णांसाठी देवदूत असून, केवळ शारीरिक उपचारांसाठीच नव्हे तर रुग्णांना मानसिक बळ देणारे डॉक्टर म्हणूनसुद्धा ते प्रसिद्ध आहेत. वैद्यकीय पेशाशी इमानदारी आणि कठोर परिश्रमामुळे आजपर्यंत हजारो रुग्णांना जीवदान मिळाले आहे. रुग्णाला आलेल्या कोणत्याही अडचणीला सामोरे जाण्याचं धाडस कोणत्याही क्षणी, कोणत्याही परिस्थितीत जर कोणी करू शकतं तर ते डॉ. इनामदार. वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्यातही डॉ. इनामदार अग्रगण्य आहेत. त्यांचे लक्षवेधी कार्य पाहता शासनाने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करावा असे प्रतिपादन डॉ. श्रेणिक शहा यांनी डॉक्टर दिनानिमित्त इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात केले.
![]() |
| उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. संदेश शहा |
यावेळी डॉ. इनामदार यांचा इंडीयन मेडीकल असोसिएशनचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. राम आरणकर आणि इंदापूर तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश पाणबुडे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर इंदापूर मधील डॉक्टरांना देवदूत सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, भारतीय जैन संघटनेचे इंदापूर शहराध्यक्ष धरमचंद लोढा, सामाजिक कार्यकर्ते कमलेश शहा, गणेश जाधव, नवनाथ रूपनवर, पंकज तांबोळी, गौरव मखरे, धनंजय कुंभार उपस्थित होते. स्वागत डॉ. राधिका शहा, काळे, महेश निंबाळकर यांनी केले. प्रास्ता असाविक व सूत्र संचालन डॉ. संदेश शहा यांनी, तर आभार डॉ. श्राविका शहा यांनी मानले.
इंदापूर शहरातील या डॉक्टरांचा देवदूत म्हणून सन्मान
शरीरातील दुर्धर आजार टाळण्यासाठी अल्कलाईन आयोनाईज्ड पाणी पिणे ही काळाची गरज - डॉ. एम. के. इनामदार
आपणा सर्वांचे जगायचे वय ६५ ते ७५ झाले आहे. याला हवा, पाणी व अन्न यामधील प्रदूषण, व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार व ताणतणावाची जीवन पद्धत कारणीभूत आहे. मानवी शरीरात ७२ टक्के पाणी तर २८ टक्के अन्न आहे. आपण चांगले अन्न खाण्याकडे लक्ष देतो मात्र चांगले पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपण अल्कलाईन पाणी पिण्यास सुरुवात केल्यास आपले अनेक आजार बरे होण्यास मदत होवून आपले जीवन निरोगी व दीर्घायुषी होईल.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा