जेसीबीचा दर आता ताशी १२०० रु. तर ब्रेकर १८०० रु. डिझेल वाढीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर जेसीबी युनियनचा निर्णय


मुत्सद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (३० ऑक्टोबर) :- वाढत्या इंधन दर वाढीचा फटका प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सर्वांनाच बसत आहे. मागील काही महिन्यांत वाढलेल्या डिझेलच्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर आता इंदापूर शहरातील जेसीबी'च्या (Backhoe Loader) दरांमध्येही जवळपास २० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे काल (२९ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आहे. त्यामुळे जेसीबीचा दर आता प्रति ताशी १२०० रु. असणार आहे, तर ब्रेकरचा १८०० रु. काल झालेल्या 'इंदापूर जेसीबी युनियनच्या' बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अमोल खराडे यांनी सांगितले. त्यामुळे इंदापूरकरांना आता जेसीबीकरवी काम करून घेण्यासाठी २०० रु ज्यादा मोजावे लागणार आहेत.

शहरात सध्या २५ च्या आसपास जेसीबी तर २ ब्रेकर आहेत. मागील अनेक वर्षांपासून जेसीबीचा दर प्रति तास १ हजार रुपये आकारला जात होता. त्यावेळी प्रति लिटर ६० रुपयांच्या आसपास असणाऱ्या डिझेलच्या दराने आज शंभरी ओलांडली आहे. दरमहा १० ते १२ हजारांच्या आसपास असणारा जेसीबी चालकाचा पगारही आता जवळपास १८ ते २० हजारांच्या घरात गेला आहे. त्यातच जेसीबीचा (Mentanance) इतर खर्च आणि बँकांचे हफ्ते पाहता जेसीबीचे दर वाढवणे आपल्याला अपरिहार्य असल्याचे युनियनने म्हटले आहे. दरवाढीची पार्श्वभूमी लक्षात घेत इंदापूर शहरातील नागरिकांनी जेसीबी चालक व मालकांना सहकार्य करावे असे आवाहन या बैठकीनंतर युनियनकडून करण्यात आले.

या बैठकीत, अमोल खराडे, सागर चव्हाण, अमोल चोपडे, सचिन ठावरे, महेश पवार, जगताप मेजर, अशोक जाधव, महेश जाधव, विजय जाधव, नाना सागर, राहुल वाघमोडे, शुभम दिवसे, आदित्य चौगुले इ. उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट