अपघात - पहाटेच्या सुमाराला लोंढेवस्तीनजीक वॅगनआर गाडी पलटी झाल्याने अपघात
| अपघातातील जखमी उपचारार्थ रुग्णालयात दाखल |
इंदापूर (४ ऑक्टोबर) :- इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर हायवेवरील लोंढेवस्तीनजीक पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका वॅगनआर गाडीचा पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असून, वाहन पलटी झाल्याने हा अपघात झाल्यानेे या अपघातात वाहन चालक सुधीर रमेश गांगवे (वय ३०), रमेश विठू गांगवे (वय ६५) दोघेही रा. यावली ता. मोहोळ जि. सोलापूर हे किरकोळ जखमी झाले आहेत, तर रमेश गांगुर्डे (वय ६०), कमल विलास गांगवे (वय ६०) आणि कार्तिक लक्ष्मण अंधारे (वय ९) सर्व रा. सोमाटणे फाटा (पुणे) हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, अपघात झाल्याची माहिती मिळताच सरडेवाडी टोलनाक्याची रुगवाहिका घटनास्थळी पोहोचली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिकेचे चालक पप्पू जगताप यांनी तात्काळ उपचारार्थ इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा