इंदापूरचा प्रसिद्ध ढोलकीपटू हरपला; बापूराव ढावरे यांचे हृदयविकराच्या तीव्र झटक्याने निधन

इंदापूर (२४ ऑक्टोबर) :- इंदापूर शहर व तालुक्यातील प्रसिद्ध ढोलकीपटू बापूराव ढावरे यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा, दोन मुली, पत्नी आणि अंध आई आहे. ते इंदापूर तालुक्यात ढोलकी वादक म्हणून प्रसिद्ध होते. बापूराव हे दृष्टिहीन असूनही ढोलकी वाजवण्यात ते एका डोळस व्यक्तीपेक्षाही जास्त प्रवीण होते.

त्यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र व सहकारी बाळासाहेब सरवदे यांनी व्यक्त केलेल्या भावना

माझ्या जिवाभावाचा ढोलकीपटू बापूराव ढावरे यांचे दुःखद निधन आज दिनांक २४ / १० / २०२१ रोजी झाले ही मनाला वेदना देणारी दुःखद घटना आज घडली. लहानपणापासून प्रत्येक लोककलेत आपल्या ढोलकीच्या तालावर भल्याभल्यांना नाचवणारा हूरहन्नरी कलाकाराचे आपल्यातून आकस्मीक निघून जाणे मनाला क्लेशदायक घटना आहे इंदापूर तालुक्यातील उत्कृष्ठ ढोलकीपटू म्हणून बापूराव ढावरे प्रसिद्ध होते.

अंध असूनही आपल्या कलेच्या जोरावर प्रपंच चालविणारा बापू आंबेडकरी गीत गायनाच्या कार्यक्रमाला माझ्याबरोबर प्रत्येक वेळी साथीला होता. तो पैशाची अपेक्षा न करता आपली हजेरी लावत होता. काही वेळा गायन पार्टीला कमी पैसे मिळाले तर आम्ही प्रत्येक वेळी त्याची बिदागी भागेल याचीच व्यवस्था पाहत होतो. रात्री अपरात्री कित्येक वेळा बापूराव आणि मी कार्यक्रमाहून परतत असताना माझ्या गाडीवर बसलेला बापू इंदापूरपर्यंत माझ्याशी गप्पा गाणी म्हणत इंदापूर कधी आले हे सुध्दा समजत नसायचे.

👆बापूराव ढावरे यांची ढोलकी ऐकली नसेल तर नक्की ऐका

गेल्याच महिन्यात मी नवीन ढोलकी आणली आणि त्या ढोलकीचे उदघाटन बापूच्याच हस्ते केले. त्यावेळी त्याला मी म्हटले बापू आता आपली हक्काची ढोलकी आहे तुला पाहिजे तेव्हा नेवू शकतो. जाता जाता माझा मुलगा पंचशील याला ढोलकी शिकवण्याचे आभिवचन देणारा माझा लाडका ढोलकीपटू बापूराव याचे अकाली जाणे मनाला वेदनादायक आहे

बापूराव तुझ्या स्मृतिला तू केलेल्या कलेच्या सेवेला कधीही विसरू शकत नाही

बापूराव तुला भावपूर्ण श्रध्दांजली

💐💐💐💐💐💐💐💐

शोकाकूल

बाळासाहेब सरवदे

९७६६३६५१८६


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट