दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार
इंदापूर (२४ ऑक्टोबर) :- इंदापूर शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यामध्ये विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण आणि प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदावर नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डाॅ. प्रा. जीवन सरवदे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष विलासदादा मखरे, माजी प्राचार्य शहाजी मिसाळ, माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, आरपीआय बारामती लोकसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब सरवदे, इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका राजश्री मखरे इत्यादी उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभेचे इंदापूर तालुकाध्यक्ष डाॅ. प्रा. जीवन सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात, एम. पी. एस. सी. परीक्षेच्या माध्यमातून आर.एफ.ओ. (वननिरीक्षक ऑफिसर) या पदावर नियुक्ती झालेले प्रमोद कांबळे, एम. बी. बी. एस. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डाॅ. समता सरवदे, नवोदय परीक्षा उत्तीर्ण कु. संबोधी मोरे, धम्मान्वय चंदनशिवे, राघवेंद्र गायकवाड, चंद्रपुर सैनिक स्कूल उत्तीर्ण सिद्धार्थ वाघमारे, पी. ई. टी. परीक्षा उत्तीर्ण प्रा. सुहास मखरे, एल .एल. बी. उत्तीर्ण ॲड. सुरज मखरे, तसेच १० वी, १२ वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पुणे जिल्हा आरपीआय संघटक-सचिव शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, प्रा.अशोक मखरे, बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष सुधीरशेठ मखरे, कोषाध्यक्ष हनुमंत कांबळे, सरचिटणीस प्रा.श्रीनिवास शिंदे, कार्यालयीन सचिव तात्यासाहेब मसलखांब, प्रा. डि.के.भोसले, प्रा. तानाजी कसबे, प्रा. राजेंद्र गायकवाड, प्रा. विद्या गायकवाड, मनिषा मखरे, स्मिता मोरे-वाघमारे, विनायक वाघमारे, भिमराव चंदनशिवे, सुनिल मखरे, रवि चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अविनाश मखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तर नगरसेविका राजश्री मखरे यांनी दिप प्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीरशेठ मखरे यांनी केले, तर सुत्रसंचालन सुहास मोरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महिला विभाग तालुका उपाध्यक्षा सुनिता शिवाजीराव मखरे यांचे 'राजभवन' या निवासस्थानी करण्यात आली.
______________________________________
दिवाळी जाहिरात संदर्भात
दिवाळी अंकात माफक दरात आपल्या जाहिराती आणि दिवाळीच्या शुभेच्छा प्रसिद्ध करण्यासाठी आमच्याशी आजच संपर्क साधा. (नोट - दिवाळी अंकाच्या ५,००० प्रति छापल्या जातील, ज्या इंदापूर शहारासह बारामती शहरातही वितरित केल्या जातील.)
संपर्क - ८२३७५३७००१/८८८८५९५९५६



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा