इंदापूरात डेंग्यू, मलेरियाची साथ, औषध फवारणीसाठी नगरपरिषदेला काँग्रेसची हाक
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२७ ऑक्टोबर) :- कोरोनाचा प्रादुर्भाव टळतो न टळतो तोच आता इंदापूर शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि गोचीडताप सारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. सध्या इंदापूर शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये याच आजारांशी संबंधित रुग्ण जास्त प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे शहरात या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांची फवारणी करण्याची गरज ओळखून इंदापूर शहर काँग्रेस कमिटीने यासंबंधीची मागणी इंदापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
वरील साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव थांबवण्याची गरज असून, नगरपालिकेने प्रभागनिहाय औषध फवारणी त्वरित चालू करावी अशा आशयाचे निवेदन काल (२६ ऑक्टोबर) इंदापूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चमनभाई बागवान यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे दिले आहे.
या वेळी काँग्रेस कमिटीचे इंदापूर शहराध्यक्ष चमनभाई बागवान, डॉ. संतोष होगले, काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस जकीरभाई काझी, महादेव लोंढे, आकाश पवार, युवराज गायकवाड, नवनाथ गायकवाड उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा